नांदेड मनपा स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत 42 करोड रुपयांच्या विकास कामांना मंजुरी
नांदेड- दि.९ मे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची पहिलीच बैठक सभापती वीरेंद्रसिंह गाडीवाले यांच्या अध्यक्ष खाली पार पडली पहिल्याच बैठकीत नांदेड शहरातील विविध विकासकामांच्या आढावा घेऊन तब्बल 42 कोटी रुपयाचे कामांना मंजुरी देण्यात आली.
शासनाकडून मिळालेला निधी आणि महानगरपालिकेचा स्वतःचा हिस्सा अशा एकूण ४१ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या प्रस्तावांना यावेळी हिरवा कंदील दाखवण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे मूलभूत सुविधांतर्गत नगरोत्थान योजना, सुवर्ण जयंती योजना आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून शहरातील नाल्यांच्या कामांसाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी पुराची समस्या आणि सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नाल्यांच्या कामांसोबतच शहरातील इतर मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी एकूण २० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शासनाच्या ३६ कोटी रुपयांच्या एकूण निधीसोबतच महानगरपालिकेने स्वतःच्या तिजोरीतून ५ कोटी रुपयांचा स्वनिधी उपलब्ध करून दिला आहे. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता प्रत्यक्ष कामांना प्रत्यक्ष जमिनीवर सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
या बैठकीत स्थायी समिती सदस्य नगरसेवक अभिषेक सौदे, तुळजाराम यादव, सविता बिरकले, सुनीता जोंधळे, कविता गड्डम, राहूल सोनसळे, आशीष नेरळकर, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निलेश सुनकेवार, उपायुक्त अभिजीत वायकोस, वित्त व लेखाधिकारी पांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.










