Home / राज्य / स्व.अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ३१ रोजी नांदेडला सर्व पक्षीय शोक सभा

स्व.अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ३१ रोजी नांदेडला सर्व पक्षीय शोक सभा

स्व.अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ३१ रोजी नांदेडला सर्व पक्षीय शोक सभा

नांदेड/प्रतिनिधी -राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले. त्यांना सर्व पक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवार ३१ जानेवारी २०२६ रोजी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्व.अजित दादांवर प्रेम करणाऱ्या जनतेनी उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व पक्षीय शहर जिल्हाध्यक्षांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे बुधवार दि.२८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता बारामती विमानतळावर त्यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. दि.२९ जानेवारी रोजी शासकीय इतमामात बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व.अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली असून महाराष्ट्र कामाचा माणूस असलेल्या दादाला गमावला आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी स्व.अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दि.३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सर्व पक्षीय आदरांजली सभेचे आयोजन कै.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरुगोविंदसिंघ जी स्टेडियमजवळ, नांदेड येथे करण्यात आले आहे. तरी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्व.अजित दादांवर प्रेम करणाऱ्या जनतेनी दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शहर) जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भाजपचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष अडवोकेट किशोर देशमुख, भाजपाचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (श.प.) शहराध्यक्ष डॉ.सुनिल कदम, कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, शिंदे गट शिवसेनेचे महानगरप्रमुख राजू गुंडावार, ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रकाश मारावार, मनोज यादव, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले, एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष अमजेद बेग, मनसेचे जिल्हाध्यक्ष स.मॅन्टीसिंघ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल