वजीराबाद पोलीस स्टेशन डीबी पथकाने गुत्तेदारांकडून पाच लाख रुपये जबरदस्तीने घेतले
नांदेड – रेल्वे विभागातील कंत्राटदार शेख असिफ शेख साबीर राहणार परभणी यांच्याकडून वजीराबाद पोलीस स्थानकातील डीबी पथकाने जबरदस्तीने पाच लाख 27 हजार रुपये घेऊन गेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे
रेल्वे विभागातील गुत्तेदार शेख असिफ शेख साबीर हे रेल्वे लाईनच्या लालवाडी पीटलाईन वर काम सुरू असताना दिनांक 13 – 11 – 2025 रोजी दुपारी दोन वाजता कामावर निगराणी करण्यासाठी ते आले होते यावेळी वजीराबाद पोलीस स्टेशनचे डीबी पथकातील पाच पोलीस आणि एक अन्य असे या ठिकाणी येऊन शेख असिफ त्यांना धमकावून या ठिकाणाहून त्यांचीच कार थार मध्ये घेऊन गेले लालवाडी पीठ लाईन येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत हे पाहून या डीपी पथकातील कर्मचाऱ्यांनी शेख असिफ त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन त्यांना धमकवले व त्यांच्या गाडीची चावी पैसे रोख रुपये पाच लाख सत्तावीस हजार आणि इतर कागदपत्रे घेऊन गेले यावेळी हे कर्मचारी मद्य प्राशन केले असल्याचेही शेक असेफ यांनी पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेक असेफ त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना आपली ओळख सांगितली तरीही हे लोक त्यांना न जुमानता त्याची तपासणी करावयास सुरुवात केली परंतु त्यांच्या थाऱ गाडीमध्ये काहीही गैर सापडले नाही किंवा यांच्याकडे काहीही कुठलेही गैर साहित्य सापडले नसल्याने याच्याकडील रक्कम त्यांनी जप्त केली यावेळी असेफ यांनी जप्त करण्याचे कारण सांगा असे म्हटल्यानंतर वजीराबाद पोलीस स्टेशनला या तुम्हाला तिथे सगळं सांगू असे म्हणाले यावरून शेख असे हे पोलीस स्टेशन वजीराबाद येथे गेले असता त्यास फक्त मोबाईल परत केले परंतु रोख रक्कम त्यांनी परत केली नाही यावर शेख असिफ यांनी मला पैसे द्या नाहीतर त्याची जप्त केल्याची पावती द्या असे बोलले असता त्यांना पोलिसांनी उलट धमकावले यावर शेख असिफ यांनी पोलीस निरीक्षक कदम यांना भेटून तक्रार दाखल करण्याची प्रयत्न केला परंतु काही कुठलीही तक्रार न घेता पोलिसांनी त्याला धमकवून पोलीस स्टेशनच्या बाहेर काढल्याचे शेख असेफ तक्रारीत म्हटले आहे.
सदरील घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशन वजीराबाद येथे आपल्याला न्याय मिळणार नाही असे समजून त्यांनी पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्याकडे 17 11 2025 रोजी तक्रार तक्रार दिली असून यामध्ये वजीराबाद पोलीस स्टेशन मधील डीबी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांची नावे जेवलासिंग बाबरी राजू बटाने हबीब चाऊस विलास कदम रमेश सूर्यवंशी व इतर एक असे नमूद केले आहे या पत्रात त्यांनी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्याकडून न्याय मिळण्याची अशा व्यक्त केली आहे.
याबाबतीत अधिक माहिती घेतली असता असेही कळते की त्याच दिवशी रात्री अकरा वाजता जुना बस स्टॅन्ड या ठिकाणी परभणी येथीलच एक आरोपी फिरत असताना ताब्यात घेतले यावेळी त्याच्याकडे एक पिस्टल आढळून आल्याने त्यास अटक केली आहे आता यावर वजीराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हे या दोघांचा काही संबंध आहे का याचा शोध घेत असल्याचेही विश्वासनीय सूत्राकडून कळते आहे.











