आज स्वर उत्सव फिल्म संगीत मेजवानी
नांदेडः- येथील स्वर उत्सव फिल्म संगीत प्रतिष्ठान नांदेड चे वतीने गीतों की बरसात – आप के साथ हा फिल्म संगीतावर आधारीत हिंदी व मराठी चित्रपटातील अविस्मरणीय, धडाकेबाज गीतांचा कार्यक्रम
दि. ७ सप्टेंबर – रोजी सायंकाळी ६:३० वा कुसुम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ईजि गणेशसिंह चंदेल व शिवाजी टाक यांची निर्मिती असलेल्या कार्यक्रमाला प्रदीप सोनटक्के यांचे दिग्दर्शन व निवेदन लाभले आहे तर कृष्णा भालेराव हे सहायक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. निःशुल्क प्रवेश असलेल्या या कार्यक्रमात लक्ष्मीकांत कुलकर्णी, बालाजी उमरीवाड, शिवाजी टाक, गणेशसिंह चंदेल, आनंद भोसले, डॉ राजेश पतंगे, विजय निलंगेकर, मंगेश क्षीरसागर, माधुरी जाधव, ललीता डुलगच, अनु पांडे, डॉ . मनिषा चाडावर हे हौशी कलाकार आपली कला सादर करतील तरी रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान संचाच्या वतीने करण्यात आले आहे.











