Samyaknews

कै. शंकराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरणासह आज उद्घाटन

नांदेड – महापालिकेच्यावतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकासाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.१३) आयोजित करण्यात आला आहे. श्री गुरु गोविंद सिंघजी स्टेडियम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमास खा. रवींद्र चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, ना. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ.आनंद बोंढारकर, आ. विक्रम काळे, आ. सतिश चव्हाण, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नूतनीकरणासह सज्ज झालेलेप्रेक्षागृह सांस्कृतिक, साहित्यिक व वैचारिक वारसा जपणाऱ्या नांदेडकरांसाठी आता अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध असणार आहे. अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा, अत्याधुनिक प्रकाशयोजना, सुसज्ज आसनव्यवस्था याठिकाणी उपलब्ध असून कलाप्रेमी व विविध क्षेत्रातील खेळाडू कलाकार यांनी या सभागृहाचा आनंद घ्यावा असेही आहवान महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले आहे

– विजय निलंगेकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top