Home / राजकारण / नांदेड–मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नांदेड–मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नांदेड–मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

नांदेड | प्रतिनिधी
नांदेड–मुंबई नियमित विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिली. या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आमदार हेमंत पाटील, राष्ट्वादीचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव बोढारकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विमानसेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
सध्या नांदेड विमानतळ सर्व सुविधांनी सुसज्ज असले तरी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा बंद आहे. मुंबई येथे नव्या विमानतळाचे काम सुरू असल्याने भविष्यात स्लॉट उपलब्ध होऊन नांदेड–मुंबई विमानसेवा नियमित सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दररोज सकाळी नांदेडहून मुंबईकडे आणि रात्री मुंबईहून नांदेडकडे विमानसेवा सुरू झाल्यास उद्योग, व्यापार, पर्यटन आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल. तसेच नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनाही या सेवेचा लाभ होणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
विभागीय आयुक्तालयाच्या प्रश्नावरही सकारात्मक भूमिका
यावेळी छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाचे विभागीय आयुक्तालय नांदेड येथे स्थापन करण्याच्या मागणीकडेही मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले. २०२५ पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न तातडीने सोडविण्याची विनंती करण्यात आली. नांदेड येथे विभागीय आयुक्तालय झाल्यास नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचून विकासाला गती मिळेल, असे शिष्टमंडळाने सांगितले. यावर सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल