मुंबईसाठी आणखी एक रेल्वे आठवड्यातून दोन वेळा धावणार
नांदेड दि.१७ मे
लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांची सुरुवात, उद्घाटन विशेष गाडी दिनांक 19 मे ला धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनंतर गाडी क्रमांक 17665/17666 तसेच 17667/17668 या दोन साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे धावणार आहेत.s
या सेवेंतर्गत उद्घाटन विशेष एकमार्गी विशेष गाडी क्रमांक 07667 नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस ही 19 मे 2026 रोजी नांदेड येथून सायंकाळी 16.00 वाजता सुटेल व पुढील दिवशी सकाळी 7.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी पूर्णा(17.10), बसमत(17.32), हिंगोली(18.42), वाशीम(19.30), अकोला(21.15), भुसावळ(23.10), मनमाड(01.22), नाशिक रोड(03.42) आणि कल्याण(06.55) मार्गे धावेल.
नियमित सेवा पुढीलप्रमाणे सुरू होणार आहे:
गाडी क्रमांक 17667 नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस : 20 मे 2026 पासून प्रत्येक बुधवारी रात्री 21.15 वाजता सुटेल व पुढील दिवशी 13.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी पूर्णा (22.15), बसमत (23.15), हिंगोली (00.25), वाशीम (01.15), अकोला (03.45), भुसावळ (05.40), मनमाड (08.12), नाशिक रोड (09.15) आणि कल्याण (12.04) मार्गे धावेल.
गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस–नांदेड एक्सप्रेस : 21 मे 2026 पासून प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 16.55 वाजता सुटेल व पुढील दिवशी 09.10 वाजता नांदेड येथे पोहोचेल. ही गाडी कल्याण (17.45), नाशिक रोड (20.53), मनमाड( 22.10), भुसावळ (00.30), अकोला (03.05), वाशीम (04.15), हिंगोली (05.25), बसमत (06.25) आणि पूर्णा (07.45) मार्गे धावेल.
गाडी क्रमांक 17665 नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस : 25 मे 2026 पासून प्रत्येक सोमवारी सायंकाळी 21.15 वाजता सुटेल व पुढील दिवशी 13.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी पूर्णा (22.15), बसमत (23.15), हिंगोली (00.25), वाशीम (01.15), अकोला (03.50 ), भुसावळ (06.00), चाळीसगाव (07.40) , मनमाड(08.50), नाशिक रोड(09.42) आणि कल्याण(12.36) मार्गे धावेल.
गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस–नांदेड एक्सप्रेस : 26 मे 2026 पासून प्रत्येक मंगळवार दुपारी 16.35 वाजता सुटेल व पुढील दिवशी सकाळी 09.10 वाजता नांदेड येथे पोहोचेल.ही गाडी कल्याण(17.26), नाशिक रोड(20.40), मनमाड(22.00), चाळीसगाव (22.45), भुसावळ(00.30), मलकापूर (01.12), अकोला(03.05), वाशीम(04.15), हिंगोली(05.25), बसमत(06.25) आणि पूर्णा(07.45) मार्गे धावेल.
या गाड्या बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या प्रमुख स्थानकांवर थांबतील. गाड्यांमध्ये वातानुकूलित, स्लीपर व सामान्य श्रेणीचे आधुनिक एलएचबी डबे उपलब्ध











