नांदेड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विरेंद्रसिंघ गाडीवाले तर महिला व बालकल्याण सभापतीपदी सोनी व उपसभापतीपदी लांडगे यांची निवड
नांदेड,दि.२४ मार्च :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मंगळवार दि.२४.०३.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या स्थायी समिती बैठक कक्षात पार पाडण्यात आली. *भाजपचे विरेंद्रसिंघ जगतसिंघ गाडीवाले* यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली असुन महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी *भाजपाच्या सदिच्छा सोनी पाटील* तर *उपसभापतीपदी निरंजना राजु लांडगे* यांची निवड झाली आहे. यावेळी *पिठासिन अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले* व *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांची उपस्थिती होती. या निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व स्थायी समिती सदस्य व महिला व बालकल्याण समितीतील सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी प्राप्त नामनिर्देशनाच्या छाननीनंतर स्थायी समिती सभापती पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त असल्याने व तो वैद्य ठरल्याने वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारास अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. परंतु उमेदवाराने माघार घेतली नसल्याने पिठासिन अधिकारी यांनी भारतीय जनता पक्षाचे विरेंद्रसिंघ जगतसिंघ गाडीवाले यांची बिनविरोघ निवड झाल्याचे जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी राहुल कर्डीले यांनी घोषीत केले.
त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण समितीच्य सभापती पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त असल्याने व तो वैद्य ठरल्याने वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारास अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. परंतु उमेदवाराने माघार घेतली नसल्याने पिठासिन अधिकारी यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदिच्छा सोनी पाटील यांची तर उपसभापतीपदी निरंजना राजु लांडगे यांची निवड झाल्याचे जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी राहुल कर्डीले यांनी घोषीत केले. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी राहुल कर्डीले व पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभुच्छा व्यक्त केल्या.











