Home / महानगरपालिका / महापालिकेच्या पौर्णिमानगर आरोग्य उपकेंद्रात रक्त चाचणी सुविधा सुरू

महापालिकेच्या पौर्णिमानगर आरोग्य उपकेंद्रात रक्त चाचणी सुविधा सुरू

महापालिकेच्या पौर्णिमानगर आरोग्य उपकेंद्रात रक्त चाचणी सुविधा सुरू

नगरसेवक दयानंद वाघमारे यांनी केली रक्त तपासणी, नागरिकांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड – दि.३ सप्टेंबर
महापालिकेच्या पौर्णिमानगर उप आरोग्य केंद्रात रुग्णालयात विविध रक्त तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. पौर्णिमानगर उपआरोग्य केंद्रातील या सुविधेचा नागरिकांनी प्रभागातील नागरिकांनी लाभ घेण्याचा आवाहन नगरसेवक दयानंद वाघमारे यांनी केले आहे.

पौर्णिमानगर येथील महापालिका उपआरोग्य केंद्रात मंगळवारी सकाळी नगरसेवक दयानंद वाघमारे यांनी स्वतःची रक्त चाचणी करून या सुविधेचा लाभ घेतला. महापालिकेच्या या रुग्णालयात सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या आगामी काळात मोफतरित्या केल्या जाणार असल्याची माहिती नगरसेवक वाघमारे यांनी दिली आहे. प्रभागातील नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्याचवेळी पौर्णिमानगर उपआरोग्य केंद्रात आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध आहेत. नागरिक या सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात.

आगामी काळात पौर्णिमानगर आरोग्य उपकेंद्राला आणखी अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी झालेल्या तपासणी दरम्यान डॉ. श्रुती कोटलवार, लॅब टेक्निशियन विजय गजभारे, ॲड. ज्ञानेश्वर देशमुख, प्रकाश सोनके, ओंकार वटमे, रवी देशमुख, मुंगल पाटील, बाबुराव हिप्परगेकर, रेणुकाबाई सूर्यवंशी, श्रीमती भालेराव, जोंधळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल