Home / राजकारण / आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना 53 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना 53 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना 53 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर :
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मानले आ. चिखलीकर यांचे आभार
नांदेड : सन 2024 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते . ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील 3 लाख 53 हजार 715 शेतकऱ्यांना आतापर्यंत 53 कोटी 50 लक्ष रुपयांचा पिक विमा मंजूर झाला आहे. यात पुन्हा तीन कोटी 51 लाख रुपयांचा पिक विमा येत्या काही तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
सन 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नांदेड जिल्ह्यासह लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील शेतीला प्रचंड फटका बसला होता. लोहा तालुक्यातील 1 लाख 74 हजार 297 शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला तर कंधार तालुक्यातील 1 लाख 68 हजार 558 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. ही बाब लक्षात घेता आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने प्रयत्न केला. अखेर या प्रयत्नाला यश आले असून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील 1 लाख 74 हजार 297 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 23 कोटी 89 लाख रुपये निधी आतापर्यंत जमा झाला आहे तर येत्या काही तासात 4,182 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1 कोटी 32 लाख रुपयांचा पिक विमा जमा होणार आहे. कंधार तालुक्यातील 1 लाख 68 हजार 558 शेतकऱ्यांना 26 कोटी 10 लाख रुपयांचा पिक विमा मिळाला होता. आता येत्या लवकरच 6678 शेतकऱ्यांना 2 कोटी 19 लाख रुपयांचा पिक विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे . आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे अखेर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील तब्बल 3 लाख 53 हजार 715 शेतकऱ्यांना आतापर्यंत 53 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मिळाला असून लवकरच आणखीन त्यात वाढ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्न करणाऱ्या आ. चिखलीकर यांचे लोहा करणार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल