Home / साहित्यिक / ‘जय जगदंब’ हे कॉफीटेबल पुस्तक इतिहास संशोधकांना अभ्यासपूर्ण

‘जय जगदंब’ हे कॉफीटेबल पुस्तक इतिहास संशोधकांना अभ्यासपूर्ण

‘जय जगदंब’ हे कॉफीटेबल पुस्तक
इतिहास संशोधकांना अभ्यासपूर्ण

नांदेड – दि. 6 एप्रिल
आई तुळजाभवानी देवीची महती सांगणारे श्रीकृष्ण दीक्षित यांनी लिहिलेले ‘जय जगदंब’ हे पुस्तक आदिमाता जगदंबेचा गौरवशाली इतिहास आणि तिचे अथांग वैभव अगदी सहज व रसाळ भाषेत भाविकांपर्यंत पोहोचणार आहे. भाविकांसह इतिहास संशाेधकांसाठी हे पुस्तक अभ्यासपूर्ण आहे. लेखक श्रीकृष्ण दीक्षित यांनी शब्दांच्या माध्यमातून मांडलेला हा भक्तिभाव सर्वच भक्तांसाठी मार्गदर्शक आणि संग्रही ठेवावा असाच आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशाेकराव चव्हाण यांनी केले.

कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन तीर्थक्षेत्री, श्रीकृष्ण गंगाधरराव दीक्षित यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘जय जगदंब’ या अत्यंत देखण्या धार्मिक कॉफीटेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी मंत्री आ. राणा जगजितसिंह यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात रविवारी तुळजापूर येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. सतीश चव्हाण, माजी आ. साै. अमिताताई चव्हाण, आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजया चव्हाण, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी आ. हनुमंत पाटील बेटमाेगरेकर, कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे नांदेड महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. चैतन्यबापू देशमुख, साै. मृणालताई राजूरकर, साै. सुषमा दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व मराठी गीत गायनाने झाली. खा. अशाेकराव चव्हाण म्हणाले, की श्रीकृष्ण दीक्षित यांनी कोविडच्या काळाचा सदुपयोग करुन हे माहितीयुक्त पुस्तक लिहिण्यास प्रारंभ केला होता. तुळजाभवानीच्या भाविकांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येकाने हे पुस्तक आपल्या घरी संग्रही ठेवण्यासारखे आहे किंवा देवी भक्तांना भेट देण्यासारखे आहे. यात तुळजाभवानीची सविस्तर आराधना असून दुर्मिळ फोटोही आहेत. विशेष म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल आणि निजाम यांचा एक ऐतिहासिक फोटो आहे. तो फोटो म्हणजे इतिहास संशोधकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दीक्षित हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. देवीच्या प्रेरणेने ८१ व्या वर्षांत सुद्धा ते पुस्तक लिहू शकले, अशा शब्दांत खा. अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्याविषयी काैतुगाेदगार काढले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमरनाथ राजूरकर यांनी ‘जय जगदंब’ कॉफीटेबल पुस्तकाचा उद्देश विशद करून हे पुस्तक व्यावसायिक उद्देश न ठेवता धार्मिक माहितीचा ठेवा म्हणून प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून जुन्या व नवीन पिढीला श्री तुळजाभवानीचे महात्म्य सविस्तर समजण्यास मदत होणार आहे, असे सांगितले. आ. जगजितसिंह राणा पाटील यांनी ‘जय जगदंब’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा कौटुंबिक आहे. श्रीकृष्ण दीक्षित यांनी लिहिलेले हे पुस्तक अतिशय चांगले आणि दर्जेदार आहे. देवी भाविकांना अधिक माहितीसाठी उपयुक्त होणार आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले

कार्यक्रमाला नांदेडच्या महापौर कविता मुळे, नांदेड मनपा स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा साेनी, नायगावचे नगराध्यक्ष विजय चव्हाण, भाेकरचे नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, बिलाेलीचे नगराध्यक्ष संताेष कुलकर्णी, धर्माबादचे नगराध्यक्ष शंकर बाेलमवाड, मुदखेडच्या नगराध्यक्षा साै. विश्रांती कदम, तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे, सुनील चव्हाण, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, गटनेते औदुंबर कदम, अप्पासाहेब पाटील, धीरज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते. कार्यक्रमासाठी लक्ष्मीकांत आचार्य, समीर देशपांडे, आशुतोष राजूरकर, विशाल कोंडो, विनीत कोंडो, कुंदन कोंडो व दीक्षितांच्या तिन्ही कन्या यांनी परिश्रम घेतले. यावेळी पुस्तकाचे मुद्रक किरण कुलकर्णी, वैभव कोशाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल