Home / गुन्हा / शारदा कंट्रक्शन कंपनीच्या कामांची सखोल चौकशी करा – नगरसेविका सौ निलमताई तूलजेश यादव

शारदा कंट्रक्शन कंपनीच्या कामांची सखोल चौकशी करा – नगरसेविका सौ निलमताई तूलजेश यादव

शारदा कंट्रक्शन कंपनीच्या कामांची सखोल चौकशी करा – नगरसेविका सौ निलमताई तूलजेश यादव

नांदेड दि.-
नांदेड शहरातील गोदावरी नदी काठावर अमृत ०.२ योजनेंतर्गत सुरू असलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून सदरील कामे ही शारदा कंट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. सदरील कामांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका सौ निलमताई यादवा यांनी नगरविकासमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील घाण पाणी १७ नाल्याद्वारे गोदावरी नदीमध्ये मिश्रित होत असल्यामुळे त्या गोदावरी नदीचे पावित्र्य अस्तित्वात राहिले नाही.

त्यामुळे गोदावरी नदी आहे, का गटार नदी असे घाणीचे साम्राज्य गोदावरी नदीपात्रात १७ नाल्याचे पाणी जाऊन प्रदुर्शित होत आहे. त्यामुळे नांदेड शहरातील गुरुगोविंद सिंगजी यांचे तीर्थस्थान आहे त्यामुळे गोदावरी नदीला अनेक परराज्यातून येणारे भाविक स्नान करत असतात पण अनेक ठिकाणी या नदीच्या पात्रात १७ ठिकाण शहरातील गटार व नालीचे घाण पाणी जात असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या नाल्याचे काम मे. शारदा कंट्रक्शन कंपनीला दिले आहे. या कंपनीचे मालक व महापालिकेच्या अधिकारी यांना हाताशी धरून नांदेड शहरातील होत असलेल्या कोट्यावधीचे कामे हे निकृष्ट दर्जाचे करून ही पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे मे. शारदा कंट्रक्शन कंपनीच्या कामांची सखोल चौकशी करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सौ निलमताई तूलजेश यादव यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन प्रत्यक्षात भेटून दिले आहे. नांदेड शहरातील मे शारदा कंट्रक्शन कंपनीच्या कामाची चौकशी होई पर्यंत त्यांना बिल देण्यात येऊ नये असेही शिवसेनेच्या नगरसेविका सौ नीलमताई तुलजेश यादव यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. य यावेळी नगरविकास मंत्री शिंदे यांनी निवेदन स्वतः वाचून बघितले व तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिले असल्याचे शिवसेना नगरसेविका सौ निलमताई तूलजेश यादव यांनी सांगितले आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख तूलजेश यादव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल