राज्यस्तरीय निवड चाचणीत नादेड पोलीस दलाचा डंका
मिलींद लोणे, कदम, बहात्तरे, सुषमा लोखंडे, उज्ज्वला सदावर्ते यांची विजयी घोडदौड
नांदेड – दि.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस खेळ निवड चाचणीत नांदेड पोलिस दलातील आठ जणांनी विजय प्राप्त करीत राज्यस्तरीय सामन्यात खेळण्याचे स्थान प्राप्त केले आहे
टेबल टेनिस संघ राज्यस्तरीय निवड चाचणीत नांदेड पोलिस दलाचे वर्चस्व राहिले असून सांगलीय येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू मिलींद लोणे, अशोक कदम, विशाल बहात्तरे, सुषमा लोखंडे, गीता कांबळे, उज्वला सदावर्ते, प्रतिभा ढगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मागच्या वर्षीही या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले होते.
सांगलीच्या पोलिस अधिकारी क्लब येथे ५ व ६ मार्च रोजी राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा पार पडली. यात राज्यातून दीडशेच्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला यात नांदेडच्या खेळाडूंनी वेगवेगळ्या गटात घवघवीत यश संपादन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. यशस्वी खेळाडूंचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.









