Home / राजकारण / पंचवीस वर्षानंतर महापालिकेत आंबेडकरांचे विचार गुंजणार

पंचवीस वर्षानंतर महापालिकेत आंबेडकरांचे विचार गुंजणार

पंचवीस वर्षानंतर महापालिकेत आंबेडकरांचे विचार गुंजणार

नांदेड दि. – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पाच उमेदवार निवडून आले आहेत यांच्या माध्यमातून महापालिकेच्या सभागृहात आंबेडकरांचे विचार गुंजणार असल्याची चर्चा आता शहरभर होऊ लागली आहे

या निवडणुकीत सोळा उमेदवारानी निवडणूक लढविली त्यापैकी पाच उमेदवारांना घवघवीत यश मिळाले यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेले प्रभाग क्रमांक सात मधून चारही उमेदवार वंचित ची निवडून आले आहेत या ठिकाणी बौद्ध समाजाची मते जास्त असल्याचे कारण दाखवून भारतीय जनता पक्षाने आपली उमेदवारी न देता शहर विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढविली परंतु या ठिकाणी या आघाडीचे काहीही चालले नाही.

काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी यामध्ये आघाडी होत असतानाच अनेक वितृष्ट निर्माण झाली आघाडी होती की नाही यावर अनेक प्रश्न निर्माण झाले अनेक वाद झाले आणि प्रभाग क्रमांक सात वरून या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली परंतु काँग्रेस पक्षाने माघार घेऊन चारही उमेदवार वंचित बहुजन आघाडीला देऊन एक प्रकारे या निवडणुकीत सकारात्मक विचार केला व वंचितला जागा सोडल्या यामुळे काँग्रेस पक्षाचे अस्तित्वाची लढाई लढत असताना वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीमुळे काँग्रेसलाही जीवदानी मिळाल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची उमेदवार निवडून आल्याचे दिसून येत आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मतदारांची संख्या अधिकची आहे म्हणूनच त्या ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले आहे.

प्रभाग क्रमांक सात मधून वंचित बहुजन आघाडीचे इंजि. प्रशांत इंगोले यांचे नेतृत्वात राहुल सोनसळे, शेख उम्मे आयमान, राजश्री गोडबोले यांनी निवडणूक लढविली राहुल सोनसळे हा युवक मतदारांमध्ये लोकप्रिय असून दुसरे राजश्री गोडबोले यांचे पती कुलदीप राक्षसमारे हे एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व दररोज काम करून आपली उपजीविका भागवणारे आणि सच्चे आंबेडकरवादी म्हणून पुढे आलेला या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाने या प्रभागामध्ये प्रभाव दाखवून दिला.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत एकूण 81 जागी पैकी 15 जागा अनुसूचित जाती साठी राखीव असूनही गेल्या पंचवीस वर्षात या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक यांनी आंबेडकर विचारांना तिलांजली दिली होती नांदेड शहरातील अनेक भागात अनेक विचारांना या सत्ताधाऱ्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला यावेळी सत्तेत असलेल्या या 15 नगरसेवकांनी त्यांनाच मदत केल्याचे दिसून आले आजही तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित आहे काही चौकात माता रमाई तसेच सम्राट अशोक यांच्या नावांची उभारणी केली असता प्रशासनाने ती दाबून टाकली त्यावेळीही या नगरसेवकांनी प्रशासनाचीच बाजू घेतली एवढेच नव्हे तर बौद्ध वस्तीवर होत असलेले अन्यायाविरुद्ध कोणतेही नगरसेवकांनी लढाई केलेली दिसून येत नाही आता तरी या सर्व दबलेल्या प्रश्नांना वाचा मिळेल अशी अपेक्षा आता वाढत चालली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नांदी महापालिकेत गुंजणार असे वाटत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल