Home / राजकारण / युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव रवी पाटील कावलगावे व भीमशक्तीचे युवा नेते इंजि. प्रदीप भोकरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश

युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव रवी पाटील कावलगावे व भीमशक्तीचे युवा नेते इंजि. प्रदीप भोकरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश

युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव रवी पाटील कावलगावे व भीमशक्तीचे युवा नेते इंजि. प्रदीप भोकरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश

नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणाऱ्या घडामोडीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव, नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ता तसेच मुखेड तालुका युवक काँग्रेसचे प्रभारी रवी पाटील कावलगावे आणि नांदेड जिल्हा शहर युवक काँग्रेसचे महासचिव व भीमशक्तीचे युवा नेते इंजि. प्रदीप भोकरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
रवी पाटील कावलगावे आणि इंजि. प्रदीप भोकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात संयुक्तपणे सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत होते. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अन्नदान, गरजू नागरिकांसाठी मदत उपक्रम, सामाजिक प्रबोधन, युवकांमध्ये संघटनात्मक जागृती, तसेच विविध हिंदू सण-उत्सव सामाजिक सलोख्याने साजरे करत त्यांनी सर्वधर्मसमभावाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
या दोन्ही युवा नेत्यांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजकारणाला प्राधान्य देत जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केला. त्यांच्या या कार्यामुळे युवक, कष्टकरी, वंचित घटकांमध्ये त्यांना मोठा जनाधार मिळत गेला.
बदलत्या राजकीय परिस्थितीचा आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, काँग्रेस पक्ष व भीमशक्ती सामाजिक संघटनेतून बाहेर पडत विकासाभिमुख आणि निर्णयक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचा ठाम निर्णय त्यांनी घेतला. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या व बालाजी पाटील खतगावकर कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.

आज आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नांदेड येथील निवासस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, उपजिल्हाप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश पाटील शिंदे, बिलोली शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव पाटील रोकडे, माझी पंचायत समिती सदस्य सुनील राणे,शहर प्रमुख राजेश जाधव, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील सातारे, वैभव मठपती, विशाल डुकरे पाटील, स्वप्निल उकंडे, रोहित त्रिभुवन या प्रवेशावेळी अनेक दिग्गज नेते-उपनेते उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली असून, युवकांचा मोठा ओघ शिवसेनेकडे वळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षांतर नसून, नांदेडच्या सामाजिक व राजकीय भवितव्यासाठी नवा निर्णायक टप्पा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल