Home / राजकारण / वंचितच्या अविनाश भोसीकर व दिलीप राठोड यांच्यावर विनयभंग,ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल

वंचितच्या अविनाश भोसीकर व दिलीप राठोड यांच्यावर विनयभंग,ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल

वंचितच्या अविनाश भोसीकर व दिलीप राठोड यांच्यावर विनयभंग,ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल

नांदेड –
वरिष्ठ नेत्यावर जातीवाचक गुन्हा दाखल केल्यास दुसरे व्यक्ती पक्षात काम करण्यास इच्छुक राहतील का असा प्रश्न आता नांदेडमध्ये निर्माण झाला आहे त्याचे झाले असे नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे हदगाव येथे उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी दिले गेले या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला अपयश आले या अपयशाची कारण शोधण्यासाठी तसेच आत्मपरीक्षण करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते अविनाश भोसीकर व दिलीप राठोड हे हदगाव येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीत बरेच चर्चा होऊन अधिकृत उमेदवाराच्या विरोधात कार्यकर्त्याच्या पत्नीला अपक्ष म्हणून उभे केले या बाबीवर खडा जंगी झाली एवढेच नव्हे तर प्रकरण हाणामारीवर गेले एकमेकांना शिवीगाळ झाली असे म्हणतात यातच जातीवाचक शिवीगाळ करत येथील महिलेच्या हात धरून तिला ओढले ढकलून दिले विनयभंग केला असे हदगाव पोलीस स्टेशनमध्ये रविराज जळबाराव दूधकवडे राहणार कांडली ता. हिमायतनगर यांनी अविनाश भोसीकर आणि दिलीप राठोड यांच्या विरोधात तक्रार दिली यावरून अविनाश भोसेकर आणि दिलीप राठोड यांनीही दूधकवडे यांच्या विरोधात हाणामारी केल्याची तक्रार पोलीस स्टेशन ला दिली हे प्रकरण जरी पोलीस स्थानकात गेली असले तरी वरिष्ठांनी केलेल्या कामावर नाराज होऊन त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा कार्यकर्त्यातून दाखल होत असेल तर इतर समाजातील कार्यकर्ते पक्षात काम करतील का असा प्रश्न आता भेडसावत आहे पक्षाचे सर्वेसर्वा ऍड .बाळासाहेब आंबेडकर हे जातीअंतासाठी लढाई लढली एवढेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीमध्ये इतर समाजातील इतर जातीतील कार्यकर्ते पक्षात कसे कार्य करतील याचा विचार करून सर्व समाजातील लोकांना उमेदवारी देऊन सहभाग नोंदविण्यास भाग पाडले पक्षाचे सर्व सर्व एड. प्रकाश आंबेडकर यांची हि भूमिका असेल तर या भूमिके विरोधात कार्यकर्त्यांनी इतर कार्यकर्त्यांना वागणूक दिली तर परिणाम काय होतील याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा. एवढेच नव्हे तर समाज माध्यमातून पक्षातील काही कार्यकर्ते खालच्या थरावर जाऊन इतर समाजातील किंवा आपल्या समाजातील इतरत्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना टीकाटिप्पणी करतात या सर्व घटनांमध्ये पक्षात काम करण्यास कार्यकर्ते तयार होतील का असंही आता प्रश्न एरणीवर आला आहे सदर प्रकरण बाळासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत पोहोचले असे मानले तर यावर काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल