कुमार कुर्तडीकर यांची नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्याध्यक्ष निवड
प्रतिनिधी नांदेड
येथील काँग्रेसचे ज्येष्ठ युवा नेते कुमार कुर्तडीकर यांची नांदेड जिल्हा काँग्रेस कमेटीच्या उत्तर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या विचारधारेवर कार्य करणारे कुमार कुर्तडीकर हे काँग्रेसचे एक निष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेवून नांदेड जिल्हा काँग्रेसकमिटीच्या कार्याध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. युवकांची मोठी फळी जोडण्याचे काम कुमार कुर्तडीकर यांनी केले आहे. एन.एस.यु.आय. या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले कुमार कुर्तडीकर यांचे पक्षश्रेष्ठीमध्ये चांगले वजन असलेले नेते म्हणून ओळख आहे. नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण यांच्या सहमतीने त्यांची उत्तर कार्याध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुमार कुर्तडीकर यांचे अभिनंदन केले.
उत्तर कार्याध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष प्रा.डॉ. यशपाल भिंगे, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, प्रदेश कार्यकारिणीचे अॅड. सुरेंद्र घोडजकर,श्रावण रॅपनवाड, अध्यक्ष राजेश पावडे यांच्यासह शहर काँग्रेस कमिटीचे संघटक सचिव धनंजय उमरीकर, उपाध्यक्ष गंगाधर गाडगे, काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जास्तीजास्त उमेदवार निवडूण आणण्याच्या दृष्टीने नांदेड उत्तर कार्याध्यक्ष कुमार कुर्तडीकर यांच्यावर विशेष जबाबदारी टाकण्यात आली आहे. पक्षाचा विश्वास आपण सार्थ ठरवू अशी स्पष्टोक्ती कुमार कुर्तडीकर यांनी व्यक्त केली.











