26 ऑगस्ट रोजी नांदेड मुंबई वंदे भारत रेल्वे धावणार
नांदेड – जालना ऐवजी नांदेड येथून विस्तारित होणाऱ्या ट्रेन २०७०५/२०७०६ क्रमांक हजूर साहिब नांदेड – सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ऑगस्ट रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
एका कार्यक्रमात इतर मान्यवर आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिड़िओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. उद्घाटनाची गाडी २६ ऑगस्ट रोजी सकाळी
११:२० वाजता नांदेड इथून निघणार आहे. ही गाडी नांदेड ते मुंबई दरम्यानचे ६१० किमी अंतर ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करेल. यात २० डबे (एक्झिक्युटिव्ह – ०२, चेअर कार – १८) असतील आणि एकूण १४४० आसन क्षमता असेल. ही गाडी नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) आणि इतर शहरांमधून दिवसा प्रवास करून मुंबई येथे दुपारी पोहोचण्याकरिता आणि मुंबई वरून संध्याकाळी/रात्री परत येण्यासाठी सोयीस्कर वेळापत्रक प्रदान करते. ही गाडी आठवड्यातून ६ दिवस (बुधवार वगळता नांदेडहून आणि गुरुवार वगळता मुंबईहून) धावते.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक प्रवाशांसाठी सुविधा आहेत जसे की ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, आलिशान इंटीरियर, स्पर्शमुक्त सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित वाचन दिवे आणि लपविलेले रोलर ब्लाइंड्स, चांगले उष्णता वायुवीजन आणि जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी यूव्ही लॅम्पसह एअर कंडिशनिंग सिस्टम. प्रत्येक कोचमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम आणि कवच तंत्रज्ञानासह सुरक्षा वैशिष्ट्ये ही एक अतिरिक्त वैशिष्ट्य आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांत या रेल्वे गाडीची उत्सुकता आहे.











