Home / शैक्षणिक / अबब माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांवर महापालिकेचे करापोटी सहा कोटी रुपये थकबाकी सर्व नावे डिफॉल्टर यादीत झळकली

अबब माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांवर महापालिकेचे करापोटी सहा कोटी रुपये थकबाकी सर्व नावे डिफॉल्टर यादीत झळकली

अबब माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांवर महापालिकेचे करापोटी सहा कोटी रुपये थकबाकी सर्व नावे डिफॉल्टर यादीत झळकली

नांदेड दि. 22 – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या हद्दीत असणाऱ्या सर्व नागरिकांना ती राहत असलेल्या किंवा त्यांच्या ताब्यात असलेल्या इमारतीला कर लावत असते या करा वरच महापालिकेचा पूर्णभार असतो शहरातील विकास कामे या पैशातूनच केली जाते पण नांदेड शहरातील जवळजवळ 3000 नागरिकांकडे शंभर करोड रुपये च्या वर थकबाकी दिसून येत आहे अशातच भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार माननीय श्री अशोक शंकरराव चव्हाण यांच्या मालकीच्या व ताब्यात असलेल्या श्री शारदा भवन शिक्षण संस्था, व संलग्न संस्था मध्ये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड येथील मालमत्ता कर थकबाकी बाकी असल्याकारणाने महानगरपालिकेच्या वेबसाईटवर डिफॉल्टर यादीमध्ये शारदा भवन शिक्षण संस्थेचे व संलग्न संस्थेचे नाव व रक्कम ची नोंद करण्यात आली आहे. ही यादी सर्वसामान्य नागरिक ही महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात.

सचिव, शारदा भवन प्राचार्य डेअरी शिक्षण – 10,50,799

सचिव शारदा भवन यशवंत कॉलेज – 11,66,979

शारदा भवन शिक्षण संस्था – 14,35,549

शारदा भवन शिक्षण संस्था यशवंत कॉलेज विस्तारित क्लासरूम – 79,52,537

शारदा भवन शिक्षण संस्था हडको – 61,56,463

सचिव शारदा भवन यशवंत महाविद्यालय क्लासरूम हॉल -53,99,222

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी प्राचार्य यशवंत महाविद्यालय क्रीडा संकुल नांदेड – 51,25,487

सचिव शारदा भवन शिक्षण संस्था व प्राचार्य विधी महाविद्यालय नांदेड – 49,87,884

सचिव शारदा भवन प्राचार्य यशवंत महाविद्यालय इतिहास विभाग -41,79,749

सचिव शारदा भवन महात्मा फुले हायस्कूल -42,65,239

सचिव शारदा भवन आय टीएम विस्तारित -39,02,753

सचिव शारदा भवन मुलींची वस्तीग्रह -37,94,250

सचिव शारदा भवन शिक्षण संस्था यशवंत महाविद्यालय क्लासरूम -33,82,519

सचिव शारदा भवन प्राचार्य यशवंत महाविद्यालय ग्रंथालय -33,62,945

सचिव शारदा भवन सावित्रीबाई फुले कन्या शाळा -20,28,917

सचिव शारदा भवन प्राचार्य विधी कॉलेज -18,48,464

प्राचार्य नांदेड फार्मसी कॉलेज -17,91,605

सचिव शारदा भवन लॉ कॉलेज -17,83,930

सचिव शारदा भवन मुलांची वस्तीगृह -16,90,516

सचिव शारदा भवन उपहारगृह – 14,38,073

एकूण थकबाकी 6,67,43,880/-

6कोटी 67 लाख
अशाप्रकारे विविध संस्थांचे इमारतीचे महानगरपालिकेचे थकीत देयके 6 कोटी 67 लाख असून ही रक्कम कधी वसूल होईल हे आयुक्त सांगू शकतील अशा प्रकारे शहरातील जवळजवळ 3000 नागरिक आहेत संस्था आहेत की ज्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी असून एकूण थकबाकीचा विचार केला तर जवळजवळ 100 कोटी रुपये थकबाकी दिसून येत आहे ही थकबाकी जर वसूल झाली तर नांदेड शहराला इतर कुठल्याही निधीची आवश्यकता नाही या शंभर कोटी रुपयातच नांदेड शहर सुजलाम सुफलाम होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल