स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान
नांदेड़ :- भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना Officer of the month व Employee of the month हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात आजच्या दिवशी ०२ वर्षापूर्वी करण्यात आली होती.
मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल Officer of the Year हा पुरस्कार मुख्य उद्यान अधिक्षक, *आपत्ती व्यस्थापन अधिकारी तथा क्षेत्रिय अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग* यांना आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्याचप्रमाणे Employee of the year हा पुरस्कार *लेखा व वित्त विभागातील वरिष्ठ लिपिक संजय बाळकृष्ण कुलकर्णी* यांना प्रदान करण्यात आला.
तसेच माहे एप्रिल मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Officer of the month हा पुरस्कार *सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता विश्वनाथ मनोहरराव स्वामी* यांना आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच Employee of the month साठी माहे एप्रिल मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पाणी पुरवठा विभागातील *कंत्राटी कनिष्ठ अभियंता मो.जकीउल्ला खान* यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच Employee of the month साठी माहे मे मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल *पाणी पुरवठा विभागातील पंप ऑपरेटर मंगेश आनंदराव देशमुख* यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याचप्रमाणे माहे जुलै मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Officer of the month हा पुरस्कार *अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण तुकाराम सोनसळे* यांना आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच Employee of the month साठी माहे जुलै मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल *स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षातील लिपिक शिरोमणी बालाजीराव केजकर* यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कारास पात्र ठरलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याने महापालिकेची सेवा तत्परतेने बजावल्याबद्दल आज स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार व सन्मान झाल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.











