महापालिकेच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅलीचे यशस्वी आयोजन
नांदेड, १०:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याचपार्श्वभुमीवर मागील तीन वर्षापासुन राज्यात “घरोघरी तिरंगा” हे अभियान राबविण्यात येत असुन सदरील अभियान यावर्षी सुद्धा दिनांक ०९ ते १५ ऑगस्ट या दरम्यान राबविले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत महापालिकेच्या वतीने *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोइफोडे* यांच्या नेतृत्वात आज दिनांक १०.०८.२०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता हडको बस स्टॉप पासुन महापालिकेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी तिरंगा कॅन्वासवर स्वाक्षरी मोहीम राबवून त्यानंतर तिरंगा प्रतिज्ञा घेऊन बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीत शहरातील विविध गट, युवा स्वंयसेवक, विद्यार्थी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था, इत्यादींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता.
सदरील “तिरंगा बाईक रॅली ” हडको बस स्टॉप पासुन सुरुवात होऊन अण्णाभाऊ साठे पुतळा-सिडको एलआयसी ऑफिस-सिडको डॉ.आंबेडकर चौक-महात्मा बसवेश्वर पुतळा-जुना मोंढा टॉवर-महावीर चौक-मुथा चौक-कला मंदिर-शिवाजीनगर-आयटीआय चौक-अण्णाभाऊ साठे पुतळा वसंतराव नाईक पुतळा-भाग्यनगर -वर्कशॉप-राज कॉर्नर -शिव मंदिर याप्रमाणे मार्गक्रमण करून साईबाबा मंदिर कॅनल रोड येथे या तिरंगा बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ.जनार्दन पक्वाने, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, दिलीप टाकळीकर, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक,मुख्य उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, क्रिडा अधिकारी रमेश चवरे, पशुशल्य चिकित्सक डॉ.रईसोद्दीनद्दीन, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, गौतम कवडे, राजेश जाधव, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, उपअभियंता प्रकाश कांबळे तसेच मनपा कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
– विजय निलंगेकर











