Home / राजकारण / अजितदादा , प्रतापराव पाटील चिखलीकर , प्रवीण पाटलांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव मध्ये अनेक सामाजिक उपक्रम

अजितदादा , प्रतापराव पाटील चिखलीकर , प्रवीण पाटलांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव मध्ये अनेक सामाजिक उपक्रम

अजितदादा , प्रतापराव पाटील चिखलीकर , प्रवीण पाटलांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव मध्ये अनेक सामाजिक उपक्रम

नांदेड – जिल्हाध्यक्ष होटाळकर यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबीर , चित्रकला स्पर्धा , शाडू माती गणपती स्पर्धेला उदंड प्रतिसाद
नायगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्ह्याचे नेते तथा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्तरीत्या जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या पुढाकारातून आज नायगाव मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याच वेळी आरोग्य शिबिर , नेत्र तपासणी शिबिर , त्वचारोग शिबिर , विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि शाडू माती गणपती निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. या सर्वच सामाजिक उपक्रम प्रचंड प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ८ ऑगस्ट रोजी स्व. डी. बी. पाटील स्मृतिस्थळ, मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नायगाव येथे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा, शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कला स्पर्धा आणि वृक्षारोपण अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते करण्यात आले तर आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आमदार अविनाश घाटे यांच्या हस्ते केले. गणेशमूर्ती कला स्पर्धेचे उद्घाटन व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते तर वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रविण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर होते.
राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी, जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे, वैशालीताई स्वप्निल चव्हाण, वसंत सुगावे, डॉ. विक्रम देशमुख, सुनंदाताई जोगदंड, अॅड. मुक्तेश्वर धोंडगे, सुनील नानवटे, बालाजी पाटील शिंदे, स्वप्निल शेषराव चव्हाण, मोहम्मद खान पठाण, दादाराव ढगे, विनायकराव पाटील शिंदे, दिगंबर पाटील शिंदे, बालाजी पाटील कदम, मारुती वाडेकर, शिवचरण डांगे, रमेश गांजापुरकर, स्वप्निल इंगळे, प्रभाकर भांजेवाड, अॅड. बाळासाहेब सोनकांबळे, साहेबराव धनगे, दीपक मोहनराव कदम, हौसाजी आनंद शिंदे, जीवन चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील कदम, श्रीकांत पाटील शिंदे, प्रदीप पाटील पवळे, आनंदराव पाटील शिंदे, गुलाब पाटील कदम, श्रीपत पाटील शिंदे, देवराज पाटील जाधव, शिवराज पाटील जाधव, सटवाजी मोदडवाड.मंगेश पाटील बेंद्रीकर सर्व पत्रकार सह अनेक नेते कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल