Home / राजकारण / माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलेल्या कामाची लवकरच सुरुवात

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलेल्या कामाची लवकरच सुरुवात

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड शहरातीलच नव्हे नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी विकास कामाचे उद्घाटन झाली परंतु आजही कामे अधुरी असल्याने ती कामे लवकरच सुरुवात करून अशी माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सम्यक ला बोलताना सांगितले
महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे विराजमान होते त्या काळात नांदेड शहरातील अनेक विकास कामे करण्याची अभिवचन एकनाथ शिंदे यांनी दिले होते व अनेक कामाचे उद्घाटन हे केले परंतु निधी अभावी आजही कामे रखडलेली आहेत तत्कालीन परिस्थितीमध्ये केवळ निवडणुकीसमोर जावयाचे आहे या उद्देशाने विकास कामाचे उद्घाटन झाले आणि आजपर्यंत त्या कामाच्या ठिकाणी साधे दगडही ठेवण्यात आले नाही तर अनेक अशी कामे आहेत जे अर्धवट पडून आहेत यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कामाचे बिल निघाले नसल्यामुळे ठेकेदारांनी कामे सोडून पोळ काढण्याचे बोलले जात आहे परंतु यामुळे पावसाळ्यातील पाणी साचून नागरिकांना नाहक त्रास होत आहे या सर्व बाबी सम्यक ने महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर मांडले असता त्यांनी काही गोष्टी मान्य करून सांगितले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या कामाची उद्घाटन केली ती कामे पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य असून ते आमच्या युतीचा भाग आहे अशी काही कामे अजून अर्धवट किंवा सुरू झाली नाहीत याची चौकशी करून तातडीने हे कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात येतील असे ते म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागातील खुर्ची रेस चा जो कार्यक्रम चालू आहे यावर टिप्पणी करताना म्हणाले या ठिकाणी कायम असा अधिकारी नसल्याने काही प्रकार घडत असतील तर ते चुकीचे असून तातडीने कायमस्वरूपी अधिकारी या ठिकाणी नेमण्यात येणार असल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल