नांदेड,११ जुलै :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ व परिसर विकसीत करणे या कामाचा लोकार्पण सोहळा दिनांक १३.०७.२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता *मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास अपारंपारीक उर्जा तथा पालकमंत्री श्री अतुल सावे* यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याच पार्श्वभुमीवर आज दि.११.०७.२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा. श्री अशोक चव्हाण यांनी प्रेक्षागृहास भेट देऊन कामाची पाहणी केली.
नांदेड हे सांस्कृतिक, साहित्यीक व वैचारीक वारसा असणारे शहर असुन नांदेडकरांसाठी आता अत्याधुनिक सुविधा असलेले प्रेक्षागृह उपलब्ध असणार आहे. या प्रेक्षागृहाच्या कामाची पाहणी करण्यासाठी खुद्द खा.अशोक चव्हाण यांनी प्रेक्षागृहास भेट दिली. प्रेक्षागृहाच्या कामाची पाहणी करतांना कामाचा दर्जा व इतर बाबींची पडताळणी यावेळी त्यांनी केली. त्याचप्रमाणे प्रेक्षागृहाचे काम अतिशय दर्जेदार झाले असून प्रेक्षागृहात डिजिटल स्क्रीन लावून प्रक्षेपणाची व्यवस्था करण्याची सूचना केली. याप्रसंगी *मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्यासह *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम* व महानगरपालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. या प्रेक्षागृहामुळे नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असल्याचे मत यावेळी खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
या प्रेक्षागृहाचे नुतनीकरण करतांना पुर्वीपेक्षा आसन व्यवस्था वाढविण्यात आली असुन आता एकाचवेळी ८२० श्रोते बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे साऊंड सिस्टीम उपलब्ध करुन दिलेले असुन संपुर्ण सभागृह हे वातानकुलित अर्थात ए.सी.असणार आहे. विशेष म्हणजे या प्रेक्षागृहावर सोलार प्लांट बसविला असुन त्यामुळे विद्युत खर्चात बचत होणार आहे. या प्रेक्षागृहाचे काम अतिशय दर्जेदार झाले असुन या लोकार्पण सोहळ्यास कलाप्रेमी नागरीकांनी उपस्थिती नोंदवावी,असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
प्रेक्षागृहाच्या कामाची दर्जा व विविध बाबींची माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या पडताळणी नंतरच नूतनीकरणासह उद्घाटन
