नांदेड – महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या आघाडीने खळबळ उडवून दिली होती याच आघाडीने संभाजीनगर इथून इम्तियाज जलील यांना खासदारही केले यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी वंचितच्या उमेदवारांना मदत केली नाही असा सूर बाहेर पडला आणि एमआयएम आणि वंचित ची आघाडीत बिघाडी झाली तत्कालीन परिस्थितीमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कशी बिघाडी केली याचे उदाहरणही वंचितचे प्रमुख एड. प् बाळासाहेब आंबेडकर यांनी उघड केले असे असताना इम्तियाज जलील यांना टिकीचे धनी बनावे लागले आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये वंचित आणि एम आय एम वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढविल्याने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव झाला यावरूनही परिस्थितीतील खरी जाणीव पुढे आले आणि या वेळेस असे स्पष्ट झाले की वंचित सोबत आघाडी नसल्याने इम्तियाज जलील यांचा पराभव झाला.

वंचित बहुजन आघाडीने टीकास्त्र करून आणि त्या इम्तियाज जलील आणि एमआयएम ला टार्गेट केले याचा कुठेतरी मनात राग ठेवून आता वंचितला परिणाम करण्याचा ठाण मांडला की काय असे दिसून येत आहे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणात आशिष वाकोडे यांनी जी भूमिका घेतली या भूमिकेला वंचित ने विरोध केला किंबहुना वेळप्रसंगी सुजाता आंबेडकर यांनी खालच्या स्तरावर आशिष वाकोडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलून दाखविले यामुळे आशिष वाकोडे ही दुखावले गेले आणि त्यांनीही इम्तियाज जलील यांची जवळीक साधून वंचित बहुजन आघाडीला कैचीत पकडण्याचे काम सुरू केले आहे माजी खासदार इम्तियाज जलील आणि आशिष वाकोडे यांचे भेटीत परभणी येथील मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील सर्व लोकांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचे आशिष वाकोडे यांनी बोलून दाखविले याचवेळी माजी खासदार जलील यांनी महाराष्ट्रभर दौरे सुरू करून विविध जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकारण कशा पद्धतीने करता येईल याची चाचपणी सुरू केली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नवीन आखणी सुरू केली आहे भारत देशात चंद्रशेखर आजाद उर्फ रावण यांनी आझाद समाज पार्टीच्या नावाने आपली उभारणी करून 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः निवडून आले आणि आपल्या पक्षाची ताकद दाखवून दिली. याच ताकतीचा फायदा घेण्याचे ठरवल्याची दिसून येत आहे महाराष्ट्रातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आझाद समाज पार्टी सोबत आघाडी करून वंचित बहुजन आघाडी ला कैचीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे कालच आजाद समाज पार्टीचे नेते गौरी प्रसाद उपास यांनी इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन काय करता येईल याचा विचार केल्याचे पुढे आले आहे. यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार चंद्रशेखर आजाद यांच्यावर स्तुती सुमने उधळली ते म्हणाले देशात बहन मायावती यांच्यानंतर दलित समाजाला पुढे घेऊन जाणारा एकमेव नेता म्हणजे चंद्रशेखर आजाद आहे त्यांचे उभरती नेतृत्व दलित समाजाला फायदेशीर ठरेल असे ते म्हणाले महाराष्ट्रातील जे दलित नेते आहेत त्यांच्यावरील विश्वास कमी झाला असून समाजाला नवीन नेतृत्वाची गरज असल्याचेही ते म्हणाले
महाराष्ट्र राज्यामध्ये काही प्रमाणात आजा समाज पार्टी म्हणून नव्हे तर चंद्रशेखर आजाद व रावण यांच्या संघर्षाला पाहून युवकांचे मोठी संख्या रावण यांच्याकडे आकर्षित झालेली आहे याचा फायदा एम आय आय एम व आज समाज पार्टी ही आघाडी केली तर मिळेल का अशी चाचणी सुरू झाली आहे या आघाडीचा परिणाम निश्चितच वंचित बहुजन आघाडीला सोसावा लागेल असे बोलल्या जात आहे परंतु येणारा काळच सांगू शकतो की ज्या आघाडीचा परिणाम किती प्रमाणात होऊ शकतो








