Home / देश / मसाप नांदेड शाखेच्या अध्यक्षपदी बालाजी इबितदार तर राम तरटे सहकार्यवाह

मसाप नांदेड शाखेच्या अध्यक्षपदी बालाजी इबितदार तर राम तरटे सहकार्यवाह

नांदेड : मराठवाडा साहित्य परिषदेचे नूतन कार्यकारणी काल बिनविरोध निवडण्यात आली . अध्यक्षपदी बालाजी इबितदार ,उपाध्यक्षपदी दिगंबर कदम , श्रीनिवास मस्के यांची तर कार्यवाह पदी प्रा. महेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
नांदेड येथील नानानानी पार्क मधील स्व. सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०२५ ते २०३० पर्यंतच्या कार्यकारिणीची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ जगदीश कदम तर निवडणूक निरीक्षक म्हणून देवीदास फुलारी यांनी काम पाहिले.
प्रारंभी दिवंगत साहित्यिक मारुती चितमपल्ली आणि नरेंद्र नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर देवीदास फुलारी यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने निवडणुकी संदर्भात प्रस्ताविक केले. शाखेचे मावळते अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी आजपर्यंतचा शाखेच्या कार्याचा आढावा घेतला. तदनंतर डॉ जगदीश कदम यांनी निवडणुकीची रीतसर प्रक्रिया पार पाडली.
ही निवडणुक सर्वानुमते बिनविरोध पार पडली. नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष बालाजी इबितदार , उपाध्यक्ष :दिगंबर कदम , श्रीनिवास मस्के , कार्यवाह महेश मोरे , सहकार्यवाह राम तरटे , कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून योगिनी पांडे सातारकर , ललिता शिंदे-बोकारे , शेख निजाम गवंडगावकर , अनुजा शंतनु डोईफोडे , धाराशिव शिराळे, व्यंकटेश काटकर आणि संजय जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर नूतन अध्यक्ष बालाजी इबीतदार यांनी आपल्या मनोगतात शाखेची देदीप्यमान परंपरा कायम ठेवत आम्ही काम करू अशी ग्वाही दिली. नूतन सहकार्यवाह राम तरटे यांनी आभार मानले. यावेळी प्रामुख्याने शंतनू डोईफोडे, बापू दासरी, भगवान अंजनीकर, माधव चुकेवाड,निर्मलकुमार सूर्यवंशी, कुलदीप नंदुरकर, देवीदास तारु शिवा कांबळे, मारुती मुंडे, लक्ष्मी पुरणशेटीवार यांच्यासह साहित्य परिषदेचे आजीव सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. दरम्यान मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी डॉ. जगदीश कदम , निवडणूक निरीक्षक देविदास फुलारी यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीचे अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल