काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस सुमन बालगृहातील अनाथ मुली सोबत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा मा. नगरसेवक सुरेश हाटकर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नेते तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश पावडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा डॉ रेखाताई चव्हाण, मा. उपमहापौर अब्दुल गफार,मा नगरसेवक रमेश गोडबोले मा. नगरसेवक रहिम खान, काँग्रेस नेते बालाजी चव्हाण सुभाष काटकांबळे गगन यादव दीपक सिंग हुजरिया उद्धव लांडगे विजय गोडबोले राहुल कोल्हे धर्मवीर वाघमारे अरविंद हाटकर रवी चिखलीकर संतोष सोनकांबळे यांच्यासह काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते. यावेळी केक कापून खासदार राहुलजी गांधी यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. राहुल गांधी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली
Advertisements
Oplus_131072






