Home / देश / रोबोटिक प्रक्रियेने ब्रेन ट्यूमरवर उपचार, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी ः न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण

रोबोटिक प्रक्रियेने ब्रेन ट्यूमरवर उपचार, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी ः न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण

नांदेड – ३० वर्षीय तरुणावर रोबोटिक असिस्टेड ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करीत यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथील डॉक्टरांनी मेंदूविकार शस्त्रक्रियेत रोबोटिक तंत्रज्ञान वापरत ४ सेमी च्या ब्रेन टयुमरने ग्रस्त तरुणाला शस्त्रक्रियेमध्ये अचूकता साधत, कमीत कमी छेद देण्यावर भर दिला यामुळे रक्तस्त्राव कमी होऊन रुग्ण बरा होण्याचा कालावधीही कमी झाला अशी माहीती सिंकदराबाद चे न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण यांनी पत्रकार परिषेदेत दिली
नांदेड जिल्हयातील पाळज ता. भोकर येथील श्रीकांत आलेवाड या तरुणांस गाडीवरून पडल्याने डोक्याला मार लागल्यामुळे नांदेड येथील डॉक्टरांच्या सल्यानुसार यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तपासणीत ४ सेमी आकाराच्या ब्रेन ट्यूमरचे निदान झाले. त्यातील गुंतागुंत आणि ट्यूमरचे ठिकाण लक्षात घेता न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. या अत्याधुनिक तंत्राद्वारे ट्यूमरला अचूकतेने लक्ष्य करणे शक्य झाले. याचबरोबर आजूबाजूच्या पेशींना होणारे नुकसान कमी झाले. या प्रक्रियेसाठी ९० मिनिटांचा वेळ लागला.
ही प्रक्रिया पारंपरिक ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियांपेक्षा खूपच कमी वेळात पार पडली. पारंपरिक प्रक्रियेमध्ये अनेकदा मोठे छेद समाविष्ट असल्याने रुग्णाचे रूग्णालयातील वास्तव्य जास्त असते. परंतु रोबोटिक असिस्टेड तंत्रामुळे कमीत कमी छेद आणि अधिक कार्यक्षम शस्त्रक्रिया प्रक्रिया करणे शक्य झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर बारकाईने देखरेख ठेवण्यात आली. रुग्णाला २ आठवड्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रोबोटिक असिस्टेड प्रक्रियेमुळे रुग्णाची प्रकृती जलदरित्या सुधारत आहे.
न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण म्हणाले की, रोबोटिक प्रणालीने शस्त्रक्रियेतील अचूकता लक्षणीयरित्या वाढवता येते. या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सक मेंदूच्या नाजूक संरचनेतून अचूकतेने मार्ग काढू शकतात व यामुळे प्रक्रियेची एकंदर कार्यक्षमता सुधारते. अधिक अचूकतेमुळे गुंतागुंतीचा धोका कमी होतो व रुग्णांना असुरक्षित व चांगले परिणाम मिळतात. याशिवाय रोबोटिक प्रणालीमुळे कमीत कमी छेद, कमी वेदना, रुग्णालयात कमी वास्तव्य शक्य होते. यामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
मेंदूतील ट्यूमरचे निदान एमआरआय किंवा सीटी स्कॅन सारख्या इमेजिंग चाचण्याव्दारे करतात
“ब्रेन ट्यूमर रोबोटिक सर्जरी” म्हणजे रोबोटच्या मदतीने मेंदूतील ट्यूमर (गाठ) काढण्याची आधुनिक शस्त्रक्रिया असून पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा अधिक अचूक आणि कमीत कमी वेदनादायक असते. रोबोटिक शस्त्रक्रिया, विशेषतः न्यूरोसर्जरीमध्ये, एक प्रगत तंत्रज्ञान आहे जे डॉक्टरांना गुंतागुंत कमी करून अत्यंत अचूक प्रक्रिया करण्यास मदत करते.
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातीलअ अधिक माहीतीसाठी सहाय्यक व्यवस्थापक श्री अनिल जोंधळे यांच्याशी 91549 95463 किंवा किरण बंडे – 9154167997 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल