उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम 15 जून जागतिक वृद्ध तथा ज्येष्ठ नागरिक आत्याचार प्रतिबंध जागरूकता दिन साजरा करणार – डाॅ.हंसराज वैद्य
15जून,जागतिक वृद्ध तथा ज्येष्ठ नागरिक आत्याचार प्रतिबंध जागरूकता दिन हा कार्यक्रम जगातिल 100 हून अधिक देशात साजरा केला जोतो.कुंटूंब तिथे एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत. आयुष्यमान वाढल्यामुळे ज्येष्ठांची संख्या झपाट्याने वाढत आहे व त्याचे प्रश्न,त्याच्यावरिल आत्याचार तथा त्यांचे शोषणही वाढले आहे. जगच आता ज्येष्ठत्वाकडे झूकत आहे. 2025 पर्यंत ज्येष्ठांची संख्या जगात विस टक्यावरून 35 ते 40 टक्यावर पहूंचेल असा आंदाज केला जात आहे!त्यामुळे जागतिक पातळीवर या दिवसाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम नांदेडच्या वतिने हा दिवस साजरा करण्याचे ठरले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर येथून “सर्व प्रकारचे आत्याचार पिडित शेकडो ज्येष्ठ नागरिक” या कार्यक्रमास अर्जासह व आपापल्या विविध प्रकरणाच्या कागद पत्रा सोबत उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटण पोलिस उपअधिक्षक (गृह) डाॅ.अश्विनी जगताप यांच्या शुभ हस्ते तर प्रमुख अतिथी तथा मुख्य मार्गदर्शक तथा व्याख्याते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे न्या. शरदचंद्रजी देशपांडे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच या कार्य क्रमास प्रमूख पाहूणे म्हणून पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, सुभाषरावजी बार्हाळे,सुप्रसिद्घ विधिज्ञ मा.श्रीमती व्ही.एन. भरकड यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
हा कार्यक्रम स्वा.से. डाॅ.दादारावजी वैद्य (आर्य) सभागृह वैद्य रूग्णालय परिसर पोलीस अधिक्षक कार्यालया समोर येथे रविवार दि.15/6/2025 रोजी दुपारी ठिक 2.00 सुरू होणार आहे. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा सर्व आत्याचार पिडित ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहान डाॅ.हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटूरकर, गिरीष बार्हाळे, ॲड.एम झड सिद्दीकी, डाॅ.शितल भालके, डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार,डाॅ.पुष्पा कोकीळ, डाॅ.प्रा.अंजली चौधरी, ज्येष्ठ पत्रकार दलित मित्र माधवराव पवार काटकळंबेकर तथा समस्त कार्य कारणी मंडळानी केले आहे.
– विजय निलंगेकर








