Home / राज्य / एक गाडी तीन भानगडी

एक गाडी तीन भानगडी

मुंबईहून जालना पर्यंत वंदे भारत ही रेल्वे गाडी सुरू झाली त्याचवेळी ही गाडी नांदेड पर्यंत यावी अशी नांदेडकरांची इच्छा सुप्त झाली ही इच्छा केंद्रीय रेल्वे बोर्डाने मान्य केली असून लवकरच वंदे भारत ही रेल्वे नांदेड पर्यंत धाव घेणार आहे परंतु ही गाडी नांदेड पर्यंत आणण्यास माझा किती वाटा आहे हे सांगण्यासाठी नांदेडचे दोन खासदार आणि एक माजी खासदार यांनी रस्सीखेच सुरू केली आहे.
रेल्वे बोर्डाने वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत वाढवली आहे यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मुंबईतूनच ही रेल्वे सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केला होता तसा केंद्रीय रेल्वे बोर्डाने प्रतिसादही दिला असा दावा केला आहे तर माजी खासदार व कंधार लोहा मतदार संघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही प्रेस नोट पाठवून ही रेल्वे नांदेड परत आणण्यासाठी प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला यश आल्याचा दावा त्यांनीही केला आहे आता खासदार अजित गोपछडे मागे कसे राहतील त्यांनीही अनेक पत्र पुरावा म्हणून देऊन ही गाडी नांदेड पर्यंत वाढविण्यास मी प्रयत्न केला असून या प्रयत्नास यश आल्याचे त्यांनीही दावा केला आहे यावरूनच म्हणावं लागत आहे की एक गाडी तीन भानगडी असो काहीही परंतु नांदेडकरांना वंदे भारत ही रेल्वे एक्सप्रेस मुंबईसाठी जाण्यासाठी मिळाली आहे हे मात्र नक्की सकाळी पाच वाजता नांदेडहून निघून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी ती मुंबईला राहील तर दुपारी दीड वाजता मुंबई येथून निघून रात्री अकरा वाजेपर्यंत नांदेडला ही रेल्वे पोचणार आहे यामुळे साहजिकच नांदेडकरांना एका आरामदायी रेल्वे प्रवासाचा आनंद घेता येईल ही रेल्वे सुरू झाल्यानंतर नांदेड रेल्वे स्थानकावरून रवाना करण्यावरून राजकारण होणार नाही असे सांगता येणार नाही या गाडीस हिरवी झेंडी कोण दाखवील यावरून निश्चितच वादाची ठिणगी उडणार तर येणाऱ्या गाडीला स्वागतासाठी कोण जावे यावरूनही राजकारण होणार आहे आणि म्हणून एक दिवस नांदेडकरांना मनोरंजनाचा ठरेल यात शंका नाही

— विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल