महाराष्ट्रात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतेच परत एकदा प्रश्नचिन्ह उभारले आहेत यावरून देशात गदारोळ झाला असून निवडणूक आयोगाला विचारलेला प्रश्नांची उत्तरे भाजपच देत आहे असे काँग्रेसचे सर्वच नेते यांनी आरोप केला आहे
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये सायंकाळी पाचच्या नंतर झालेल्या मतदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत जी आकडेवारी सांगण्यात आली त्यानंतर सायंकाळी पाचच्या नंतर जवळजवळ दहा ते बारा टक्के मतदान जास्त झाल्याची निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या या निवडणुकांमध्ये युती सरकारला घवघवीत यश मिळाले असून महाराष्ट्रात सत्ता आली आहे. आता वेगवेगळ्या मतदारसंघातून पराभूत झालेल्या उमेदवार आणि काही विजय उमेदवार यांनीही सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी नुकतेच एक लेख लिहून या प्रश्नाला वेगळे वळण दिले आहे याचाच भाग म्हणून उद्या दिनांक 13 जून रोजी नांदेड शहरात काँग्रेस पक्षातर्फे मशाल रॅली चे आयोजन केले आहे या रॅलीचे आयोजन खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असून मतदारांना जागृत करणे हा उद्देश असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये नांदेड जिल्हाध्यक्ष माजी आ. हनुमंतराव बेटमोगरेकर महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी सांगितले जुना मुंडा टावर येथून निघणार आहे ही मशाल रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत येणार आहे या रॅलीमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशी आव्हान काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेश सदस्य एकनाथ मोरे, राजेश पावडे, प्रवक्ते मुंतजबोद्दीन, अब्दुल गफार अब्दुल सत्तार, मुन्ना अब्बास हुसेन यांची उपस्थिती होती








