Home / देश / भाजपा महानगरच्या वतीने आज वृक्षारोपण

भाजपा महानगरच्या वतीने आज वृक्षारोपण

नांदेड – विश्व पर्यावरण दिवसा निमित्त शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवाजी नगर औद्योगिक वसाहत नाना -नानी पार्क येथे खा. अजित गोपछडे ,संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहीती भाजपा महानगराध्यक्ष,माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी दिली आहे.
या वृक्षारोपण सोहळ्यास महापालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे,कै.रामगोपाल गुप्ता औद्योगिक वसाहतचे अध्यक्ष सतिश सामंते आदींची उपस्थिती राहणार आहे. विकासाच्या आणि आधुनिकतेच्या शर्यतीत पर्यावरणाची हानी होत आहे. विश्व पर्यावरण दिनानिमित्त जगभरात पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविले जाते.पर्यावरण संरक्षण, संवर्धन व्हावे असा संदेश असलेल्या या कार्यक्रमास भाजपा पदधिकारी ,कार्यकर्ते व पर्यावरण स्नेहींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी महापौर.सौ मोहिनी विजय येवनकर,सौ ज्योती कल्याणकर,सौ शततारका पांढरे,सौ अपर्णा चितळे व सौ. पूनम कौर धुपीया यांनी केले आहे.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल