Home / राज्य / ज्येष्ठ नागरिक उ.म.प्रा.वि.फेस्काॅम नांदेडच्या सर्व साधारण महासभेची जैयत तैयारी- हंसराज वैद्य

ज्येष्ठ नागरिक उ.म.प्रा.वि.फेस्काॅम नांदेडच्या सर्व साधारण महासभेची जैयत तैयारी- हंसराज वैद्य

नांदेड – येत्या शनिवारी 31मे 25 ला नवा कौठा गुरूद्वारा डेरा येथे सकाळी 11वाजताच्या ज्येष्ठ नागरिकांच्या महा बैठकीला मा.आ. बालाजी राव कल्याणकर यांना डाॅ.हंसराज वैद्य यांनी उपस्थित राहाण्याची विनंती केली.तेव्हा मा.आ. बालाजीराव कल्याणकरांनी ज्येष्ठा नागरिकांच्या महा बैठकीला उपस्थित राहाण्याचे तर मान्य केलेच पण येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पक्षाच्या निवडणूक जाहिरना म्यात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलबित न्याय मागण्यांचा अंतर्भाव करण्याचा मी प्रयत्न करतो आणि येत्या पावसाळी अधिवेशनात, विधान सभेतही मांडण्याचा मी प्रामाणीक प्रयत्न करतो असे अभिवचण दिले!ते म्हणाले की मी एक प्रामाणिक पणे काम करणारा “रयतेचा आमदार” आहे! ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्थारातील मतदार समूहाने मला भरघोष मतांनी निवडून दिलेले आहे म्हणून मी आज आमदार आहे! रयतेचा आमदार आहे!
आज शहरी तसेच ग्रामिण भागातील ज्येष्ठ नागरिक हे अत्यंत हालाक्याच्या परिस्थित जीवन व्यथित करत आहेत हे मी रोजच प्रत्यक्ष जवळून पहातो व अनुभतोहीआहे.तेव्हा ज्येष्ठ नागरिकां च्या या महत्वपूर्ण बैठकीत सर्वा समोर मी माझी भूमिकाही स्पष्ट करणार आहे.मी माझ्या “ज्येष्ठ माय बाप रयेते” साठी आता दौडणार आहे! सभेची संपूर्ण तयारी झाली आहे.तेव्हा उ.म. प्रा.वि. फेस्काॅमच्या सर्व कार्य कारणी सदस्यांनी व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहान अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य,सचिव प्रभाकर कुंटूरकर व कोषाध्यक्ष गिरिष बार्‍हाळे तथा समस्त कार्यकारणी नी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल