Home / राजकारण / आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक राहुल प्रधान कांग्रेसच्या वाटेवर

आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक राहुल प्रधान कांग्रेसच्या वाटेवर

नांदेड – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपली विचारसरणी मानून समाज काम करणारे व दलित पॅंथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक सदस्य असलेले एस एम प्रधान यांचे पुत्र राहुल प्रधान जेव्हापासून समाजकारणामध्ये सक्रिय झाले तेव्हापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि एसएम प्रधान यांचे विचार आपल्या मनाशी गाठ मारून समाजकारण केले. यासाठी युथ पँथर सामाजिक संघटना स्थापन करून प्रस्वेथपिताना दोन हात केले. वेळोवेळी अन्याय तिथे राहुल प्रधान असं गणित नांदेड शहरांमध्येच नव्हे तर मराठवाड्यामध्ये बनले आहे.

Oplus_0

आंबेडकर चळवळीच्या लोकांवर अन्याय झाल्यानंतर राहुल प्रधान यांनी न्यायाची लढाई आणि रस्त्यावरील लढाई सशक्तपणे केली आणि आपल्या विचाराचे अनेक युवक त्यांनी आपल्या सोबत घेतले त्यांच्या या कार्याला पाठिंबा म्हणून आंबेडकरी विचाराचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या एका शब्दावर आजही रस्त्यावर उतरणारी फळी निर्माण झालेली आहे हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालत असताना घडत असते.
Oplus_0

वेळप्रसंगी राजकीय भूमिका मांडत असताना आंबेडकर विचारांच्या विरोधी असलेल्या भारतीय जनता पार्टी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या विचारांना कधीही आपल्या विचाराची सरमिसळ होऊ दिली नाही यांच्या विचाराला प्रखरपणे विरोध करून आंबेडकर चळवळ कशी जिवंत राहील याचाच सदैव प्रयत्न करत राहिले परंतु मागच्या एका वर्षापासून त्यांनी समाजकारण राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला परंतु ते दूर का राहत होते ते आता स्पष्ट झाले आहे गेल्या एक वर्षापासून ते काँग्रेस पक्षाच्या जवळीक साधण्याचा प्रयत्नात होते आणि तो जवळजवळ यशस्वी होत असताना दिसून आला आहे नांदेड शहरांमध्ये जय जवान जय किसान या रॅलीसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले असता त्यांनी राहुल प्रधान यांचे निवासस्थानी भेट घेतली या भेटीत समाजकारणावर आणि आंदोलनावर चर्चा झाल्याचे जरी बोलत असतील तरी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष एका ज्वलंत धगधगत्या आंदोलनकर्त्याच्या घरी भेट घेतो म्हणजे केवळ सामाजिक नसतो तो राजकीय ही असतो आतापर्यंतच्या अनुभवातून हे सर्वांनाच माहिती आहे याच मालिकेत आता राहुल प्रधान हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा चर्चा न राहता ते वास्तवात उतरेल असे दिसून येत आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते जा मुलांनो आता संपली रे कथा……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल