Home / राजकारण / मी जिथेही राहील इमानदारीने राहील असे म्हणणारे खा. अशोक चव्हाणांची ईमानदारी सुरू

मी जिथेही राहील इमानदारीने राहील असे म्हणणारे खा. अशोक चव्हाणांची ईमानदारी सुरू

मी जिथे ही राहील तिथे इमानदारीने काम करेल असे सांगून भाजपमध्ये प्रवेश करणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता इमानदाराने काम करायला सुरवात केली आहे गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये भाजपाची सर्व कार्यप्रणाली समजून घेतल्यानंतर आता त्यांनी भाजपाला सर्व ती मदत आणि भाजपाची नांदेडमध्ये शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत याचाच भाग म्हणून गेल्या महिन्याभरामध्ये अनेक काँग्रेसवासीयांना भाजपवासी केले एवढेच नव्हे तर आपल्या सोबत काँग्रेसमध्ये असताना सहकारी होते त्यांना आपल्या सोबतच भाजपमध्ये प्रवेश दिला त्यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना महानगर अध्यक्ष पद देऊन आपली बाजू भक्कम करून घेतली आहे एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी आपल्या कांग्रेसी सहकाऱ्यांना भाजपमध्ये पदे देऊन आपला गड कायम राहील याची काळजी घेतली आहे
नांदेड शहरामध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा अनावरणाच्या प्रसंगावरून अशोकराव चव्हाण हे केंद्रातील सत्ताधीश असलेले अमित शहा यांना बोलावून आपली बाजू आणखीनच भक्कम कशी होईल याची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे भाजपामध्ये प्रवेश करतानाच त्यांना खासदार पद बहाल करण्यात आले त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलीला मुदखेड मतदारसंघातून आमदार पदी निवडून आणले याचबरोबर चार मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून आले यामुळे भाजपाची बीजे कधी नव्हे ते नांदेड जिल्ह्यामध्ये रोवली गेली. या पुढील पायरी म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा अनावरण निमित्ताने अमिषा यांना बोलावून आपले वर्चस्व निर्वादपणे सिद्ध करत असल्याचे दिसून येत आहे या निमित्ताने शिवाजीनगर येथील त्यांचे निवासस्थाने आजपर्यंत काँग्रेसचे पंतप्रधान अध्यक्ष व अशा प्रकारच्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती या ठिकाणी आली होती परंतु आता पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी अमित शहा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निमित्ताने अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मी जिथेही राहील इमानदारीने राहील…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल