नांदेड दि. 24 ः भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्यांची काही दिवसांपूर्वी नांदेड भाजपा महानगर अध्यक्षपदी निवड झाली आहे असे माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी मनपा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी नव्यानेच उघडलेल्या भाजपा महानगर कार्यालयाचे उद्घाटन देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दि. 26 रोजी उद्घाटन होणार आहे.
शहरातील शिवाजीनगर औद्योगिक वसाहत येथील नाना-नानी पार्क समोर उभारण्यात आलेल्या भाजप महानगर कार्यालयाचे उद्घाटन सोमवार दि. 26 मे रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.या उद्घाटन सोहळयास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण, पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,राज्यसभेचे खा.डॉ.अजित गोपछडे,मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा महानगराध्यक्ष,माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.
