Home / देश / नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे चालतात हे स्पष्ट झाले !

नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे चालतात हे स्पष्ट झाले !

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारण्यांच्या पक्ष फुटीच्या नंतर आता कार्यकर्त्यांना फोडण्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रयोग सुरू झाला आहे या प्रयोगामध्ये कोण कुठे कसा आणि कधी जाईल याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही मोठा नेता असो की कार्यकर्ता सगळ्यांची अवस्था बेचैन झालेली आहे आणि अशा परिस्थितीत कोण काय करेल हेही सांगता येत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचा पक्ष नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा नव्हता परंतु माजी खासदार आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रवेशाने या पक्षाला चांगले दिवस आले आहेत सहा महिन्यांमध्ये जवळजवळ पाच ते सहा लाख कार्यकर्ते जोडल्या गेले त्याचप्रमाणे भाजपमध्येही माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी प्रवेश केल्याने भाजपालाही चांगले दिवस आले आहेत परंतु माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि माजी खासदार व आमदार प्रताप पाटील यांचे राजकीय वैर सर्वांनाच ज्ञात आहे या दोघांच्या स्पर्धेमध्ये कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच चंगळ होत आहे या स्पर्धेमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका मटका किंग म्हणजेच अवैध धंदे करणाऱ्या अन्वर अली यास पक्षात प्रवेश दिला यावरून महाराष्ट्रात चांगलेच वाजले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या प्रवेशाने अजित पवार यांची काही चूक नसून स्थानिक कार्यकर्ते अजित पवार यांची दिशाभूल करत आहेत असे सांगून परत एकदा प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्याला डिवचले आहे आणि याचा परिणाम म्हणून लागलीच प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वतःची चूक मान्य करून अन्वर अली यांना पक्षातून बाहेर काढले तसेच अन्वर अली यांना पक्षात आणणारे बच्चू यादव यांनाही पक्षातून बाहेर काढले यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोकरावांवर टीकास्त्र सोडत आपल्याही पक्षात अवैध धंदेवाल्यांची कमी नाही आपणही आता परीक्षण करावे असे सांगितले
हे सध्याला नांदेड जिल्ह्याचे वातावरण असून यामध्ये राजकारणांचे आणि कार्यकर्त्यांचे पितळ उघडे पडत आहे हे जरी असले तरी नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध धंदे होत आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे आणि हे अवधधंदे आता महाराष्ट्रभर चर्चेचे साधन बनले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध धंदे चालतात हे अधोरेखित झाले आहे आता पोलीस प्रशासन याकडे कोणत्या पद्धतीने पाहील आणि यावर काय निर्णय घेईल हे आता नांदेडकरांना पडलेला प्रश्न कसा सुटेल याकडे लक्ष लागून आहे

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल