Home / देश / 15 ते 30 मे कालावधीत विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

15 ते 30 मे कालावधीत विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

नांदेड दि. 8 एप्रिल :-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना यांचे संयुक्त विद्यमाने विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 15 ते 30 मे 2025 या कालावधीत सकाळी 6 ते सायं.8 व सायं 5.30 ते 7.30 या वेळेत जिल्ह्यातील विविध स्थळी आयोजित करण्यात येणार आहे.
तरी एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी, क्लब, अकादमी व क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक यांनी ज्या खेळांचे प्रशिक्षण शिबिर आपण घेणार आहात त्या खेळांचे नाव व प्रशिक्षण स्थळ तसेच प्रशिक्षणाची वेळ सकाळ व संध्याकाळ नमुद करुन तसे लेखी पत्राद्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कळवावे.
या प्रशिक्षण शिबिरादरम्यान जे प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ इच्छितात त्यांनी आपले नाव व खेळ बाब नमूद करावी व तसा फॉरमॅट फॉर्म जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहील.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील एकविध खेळ संघटना, क्लब व अकादमी यांच्यामार्फत वरील कालावधीत संपन्न होणाऱ्या उन्हाळी मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबिरास सहभागी होण्याऱ्या सर्व प्रशिक्षणार्थीना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेडच्यावतीने वरील कालावधीचे सहभागी प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येतील. तरी नांदेड जिल्ह्यातील एकविध खेळ संघटना, क्लब व अकादमी यांनी त्यांच्या स्तरावरुन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या संदर्भाने अवगत करुन जास्तीत जास्त नांदेड जिल्ह्यातील खेळाडुंना सहभागी करुन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर यशस्वी संपन्न करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

– – – विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल