Home / राज्य / पोलीस दलाच्या वतीने तीन मे रोजी रोजगार मेळावा

पोलीस दलाच्या वतीने तीन मे रोजी रोजगार मेळावा

नांदेड – जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलीस दलाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मिशन उडान योजनेअंतर्गत तीन मे रोजी सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालय नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यात दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर असलेल्या व वयाची १८ ते ४० वयोमर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सदर मेळाव्यामध्ये २५ पेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून दोन हजारापेक्षा जास्त तरुण-तरुणींना
रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी पोलीस दलाच्या वतीने क्यूआर कोड उपलब्ध करून दिलेला आहे. त्या क्यूआर कोडच्या माध्यमातून संबंधितांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, खंडेराय धरणे व पोलीस उपअधीक्षक (गृह) डॉ. अश्विनी जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल