नांदेड दि. 25 एप्रिल : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली पुरस्कृत राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 या वर्षाकरिता www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांकडून या योजनेचे अर्ज मागविण्यात आली आहेत.
या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्यावत (QX World University Ranking) 500 च्या आतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते. त्यासंबंधीची जाहिरात केंद्र शासनाच्या www.nosmsje.gov.in या संकेतस्थळावर 17 पानांची पीडीएफ स्वरुपात विस्तृत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी केंद्र सरकार पुरस्कृत National Overseas Scholarship या परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता सदरील संकेतस्थळावर सांगितल्याप्रमाणे अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी केले आहे.
– विजय निलंगेकर
केंद्र सरकार पुरस्कृत परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
