जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे इस्लामिक आतंकवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप हिंदू बांधवांच्या अंदाधुंद गोळीबार करून केलेल्या निर्घुण हत्तेच्या निषेधार्थ आज दिनांक 25 एप्रिल रोजी सर्वपक्षीय नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर , नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी , नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर , नांदेड महानगर अध्यक्ष जीवनराव घोगरे यांनी केले आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या दोन दिवसापूर्वी इस्लामिक आतंकवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर बेधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तब्बल 27 पर्यटकांचे बळी गेले आहेत. इस्लामिक आतंकवाद्याकडून हा भारताच्या अस्मितेवर , हिंदुत्वावर आणि लोकशाहीवर हल्ला आहे. या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. या अनुषंगाने उद्या दिनांक 25 एप्रिल रोजी सर्वपक्षीय नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये सर्व व्यापारी , सर्व असोसिएशन , सर्व शाळा , महाविद्यालये ,ट्युशन , प्रतिष्ठान बंद ठेवून सहभागी व्हावे आणि देशावर होणाऱ्या अशा आतंकवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध करावा असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. बंद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा आणि बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
