Home / राज्य / भारतीय जनता पार्टी तालुक्यातील मंडळ अध्यक्षांची निवड

भारतीय जनता पार्टी तालुक्यातील मंडळ अध्यक्षांची निवड

भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियानांतर्गत लोहा कंधार विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवड प्रक्रिया अंतिम करण्यात आली असून त्या अनुषंगाने कंधार तालुक्यात तीन नव्या मंडळाची रचना केली असून तिन्ही मंडळाच्या अध्यक्षाचे आज निवड करण्यात आली.
दि 20 एप्रिल रोजी कंधार येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी कंधारची संघटनात्मक निवडीची बैठक जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,भारतीय जनता पार्टी लोहा कंधार विधानसभा क्षेत्रातील कंधार व लोहा मंडळातील मंडळ अध्यक्ष यांची घोषणा दि 20 एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे व कार्याध्यक्ष मा. रविंद चव्हाण यांनी मंडळाध्यक्ष नियुक्ती ची भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई यांनी जिल्ह्याकडे पाठवली त्या अनुषंगाने कंधार तालुक्यामध्ये नव्याने तीन मंडळाची रचना करण्यात आली त्यात कंधार दक्षिण, कंधार उत्तर व कंधार शहर अशी मंडळ रचना करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे वाढलेले काम व विविध अभियान या अनुषंगाने ही रचना करण्यात आली असल्याचे जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे यांनी यावेळी सांगितले , भाजप कार्यालय मुंबई येथे कोर कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्यसभा सदस्य खा.अशोकराव चव्हाण, राज्यसभा सदस्य खा. डॉ अजित गोपछडे, मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हा अध्यक्ष संतुक हंबर्डे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीत कंधार दक्षिण तालुकाध्यक्ष अड विजय धोंडगे, कंधार उत्तर तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे व कंधार शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली याची निवडी ची घोषणा भारतीय जनता पार्टी कार्यालय कंधार झालेल्या बैठकीमध्ये भाजपा जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगवे यांनी केली , यावेळी पंचायत समितीचे सदस्य डॉ सुनील धोंडगे, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, पंचायत समितीसदस्य उत्तम चव्हाण, तालुका उपाध्यक्ष शंकर जाधव, उद्धव पाटील ढेपे ,दत्ता पाटील पेठकर, दत्ता कारामुंगे ,शरद पाटील भागानगरे, भरत पाटील चिखलीकर ,कमलाकर शिंदे , मधुकर फाजगे ,दत्तात्रय घोरबांड,माणिक पाटील काळम ,शिवा पाटील ,अजिंक्य पंडागळे, आनंदराव पाटील खंडागळे, प्रवीण मगनाळे, मनोहर मंगनाळे, प्रदीप मगनाळे, बालाजी घोडके ,दत्तात्रेय बंजपले ,मल्हारी पाटील वरपडे, रमेश वाघमारे,सुमित लाटकर, रवी संगेवार, उद्धव पाटील कवडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल