नांदेड सातबारा चे मालक दहा दिवसापासून नॉट रिचेबल
नांदेड – नांदेड जिल्ह्याला पुराने वेडले असताना नांदेडचा सातबारा माझ्या नावावर आहे असं म्हणणारे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण मात्र गेल्या दहा दिवसापासून नॉट रिचेबल आहेत
मुखेड तालुक्यांमध्ये पुराणे आहाकार माजवला असून पाच जणांचा मृत्यू तर 200 पर्यंत जनावरांच्या मृत्यू आणि हजार ते दोन हजार घरांची पडझड झाली असताना इकडे पाहण्यासाठी मात्र माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे वेळ नसल्याचे बोलले जाते. मागच्या दहा दिवसापासून पावसाने जिल्हाभरात तांडव माजवले असून नागरिक या पावसाच्या कहरणे त्रस्त असून जनजीवन विस्कळीत झाले असून जगणं मुश्किल झाले आहे अशा परिस्थितीत खा. अशोकराव चव्हाण यांची मुलगी आ. श्रीजया अशोक चव्हाण यांना लोकमत समूहाने पुरस्कार जाहीर केला आणि तो पुरस्कार परदेशात वितरण करण्यात पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी पालकमंत्री सह परदेशात असल्याने या प्रलयंकारी परिस्थितीत नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना आता पसरली आहे.
हदगाव हिमायतनगर भागातही फार मोठ्या प्रमाणात या पावसाने जनजीवन त्रस्त केले आहे.
जिल्हाभरामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला असून 200 ते 300 जनावरे मृत्यू पडले आहेत जवळजवळ हजार नागरिक बेघर झाले आहेत हजारो हेक्टर जमीन पान्या खाली येऊन बरबाद झाली आहे अशा परिस्थितीत नांदेडचा सातबारा माझ्याकडे आहे म्हणणारे खा. अशोकराव चव्हाण मात्र कुठे आहेत याचा शोध घेण्याची वेळ नागरिकावर आलेली आहे.











