नांदेड : पंढरपुर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे प्रत्येकाला जमत नसल्याने आणि पांडुरंगाच्या पादुकांचे नांदेडमध्येच भावीकभक्तांना दर्शन व्हावे या भक्तीमय भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांच्या पुढाकारातून काल नांदेडमध्ये पांडुरंगाच्या पादुकांची भव्य पालखी काढण्यात आली.
जेष्ठ ऊद्योजक निळकंठराव पावडे, सिंधुताई पावडे ,पोलीस ऊप अधिक्षक सुशिलकुमार नायक , प्रसिद्ध नाटककार संकर्षण कऱ्हाडे ,वंदनाताई गुप्ते,संध्याताई सरणाईक ,वैशाली ताई देशमुख, पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक कैलास जाधव , विशाल पावडे,विमलेश्वर वारकरी संस्थेचे शिवाजी महाराज, ज्यांनी या कार्यक्रमाचं देखन आयोजन केलं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा वेलिंग्टन स्कुलचे अध्यक्ष विनोद पावडे , मुख्याध्यापक चलपतीराव सर,पत्रकार श्रिनीवास भोसले, सतिश शिरसाट सर,यश पावडे ,जय पावडे, स्वराज देशमुख,पृथ्विराज देशमुख ,काशिनाथ भोंग,,संदीप भायकाटे, सोपान कदम,सोपान नवघरे,किरण डोंगरे,शिल्पाताई भोसले,पुनम बोकारे,ई उपस्थित होते.
दरवर्षी वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जात असतात. तब्बल एक महिना पायी वारी करून आपल्या विठुरायाच्या चरणावर डोकं ठेवून विश्वाच्या सुखाची प्रार्थना केली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतही पंढरपूरच्या वारीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेता नांदेड मधील भाविक भक्तांना नांदेडमध्येच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुकांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी काल नांदेडमध्ये पायीवारी दिंडीचे आयोजन केले आले होते. दुपारी चार वाजता महात्मा फुले पुतळ्यासमोरून या दिंडीला सुरुवात करण्यात आली पाडुरंगाच्या पादुकांचे आणि पालखीचे पुजन ज्येष्ठ उद्योजक निळकंठराव पावडे, सिंधुताई पावडे , पोलीस उपाधीक्षक सुशील कुमार नायक, प्रसिद्ध नाटककार संकर्षण कऱ्हाडे , ज्येष्ठ अभिनेत्री वंदनाताई गुप्ते आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले . कुसुम सभागृहापर्यंत काढण्यात आलेल्या पायी वारी दिंडीमध्ये वेलिंग्टन इंग्लिश स्कूल , लिटल स्कॉलर इंग्लिश स्कूल , केंब्रिज विद्यालय यासह नांदेड शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी कुटुंब कीर्तन या कौटुंबिक नाटकाचेही विनोद पावडे यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते. नांदेड शहरातील शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी या नाटकाचा आनंद लुटला.
– विजय निलंगेकर