त्या_९_नराधम_पोलिसांनी_फाशी
भारतीय इतिहासात वाचण्यात आलेली पहिलीच घटना असेल बहुतेक ज्यात एवढ्या संख्येने गुन्हेगार_पोलीस असतील आणि हायकोर्टाने पोलिस निरीक्षकासह एकूण ९ पोलिसांना मृत्यूदंड_फाशी सुनावली असेल.
#माणुसकीला_काळीमा_फसणारे_कृत्य आणि त्यांचा न्याय आज 6 वर्षांनी मिळाला
घटना तामिळनाडूतील
#पी_जयराज आणि त्यांचा मुलगा #जे_बेंनिक्स यांच्या कोठडीतील मृत्यूशी संबंधित आहे.
तर घडले असे होते तर १९ जून २०२० रोजी, कोविड-१९ लॉकडाऊन निर्बंधांचे कथित उल्लंघन केल्याबद्दल जयराज ह्यांना त्याच्या दुकानातुन पोलिसांनी पकडले आणि पोलीस स्टेशनं मध्ये नेले काय झाले म्हणून त्यांचा मुलगा बेंनिक्स विचारायला गेला तिकडे पण विवाद झाला
त्याला ही थूथुकुडी जिल्ह्यातील साथनकुलम पोलिसांनी ताब्यात घेतले.
२० जून २०२०: जयराज आणि बेनिक्स यांना पोलीस कोठडीत रात्रभर अमानुष मारहाण करण्यात आली.
पोलिसीनीं त्याच्यावर एवढा अमानुष अत्याचार केले
तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोठडीत असताना क्रूरपणे रक्तबंबाळ होइस तोवर मारहाण करण्यात आली होती.
सकाळी त्यांना कोविलपट्टी उपकारागृहात (Kovilpatti Sub-jail) पाठवण्यात आले.
२२ जून २०२०: त्याच दरम्यान प्रथम बेंनिक्सला छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर
बेनिक्सची प्रकृती बिघडल्याने त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे रात्री ९:०० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी २३ जून २०२० ला पहाटे ४:३० च्या सुमारास पी. जयराज यांची ही तब्येत बिघडली यांचाही रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त झाला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सर्व पुरावे आणि चौकशी पूर्ण झाल्यावर
मागील 6 वर्ष न्यायिक प्रक्रिया सुरु होती
आज ६ एप्रिल २०२६ मध्ये, मदुराई न्यायालयाने एकूण नऊ पोलिसांना दोषी ठरवले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
त्याची नावे 👇
एस. श्रीधर (तत्कालीन इंस्पेक्टर)
पी. रघु गणेश (सब-इंस्पेक्टर)
के. बालकृष्णन (सब-इंस्पेक्टर)
एस. मुरुगन (हेड कांस्टेबल)
ए. सामीदुरई (हेड कांस्टेबल)
एम. मुथुराज (कांस्टेबल)
एस. चेल्लादुरई (कांस्टेबल)
एक्स. थॉमस फ्रांसिस (कांस्टेबल)
एस. वेलमुथु (कांस्टेबल)
१० वा आरोपी पॉलदुरई २०२० मध्ये आजारी असल्यामुळे मृत्यू पावला.)
भारतीय इतिहासात न्यायालयाने या नऊ पोलीस आरोपींना शिक्षा देऊन नक्कीच योग्य इतिहास रचला आहे.
खऱ्या अर्थाने आज पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला अशी भावना आता जनतेतून उमटत आहे आता प्रतीक्षा महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वर घडलेल्या अन्यायाची.











