Home / राज्य / नांदेड येथून गोवा व नागपूर विमान सेवा

नांदेड येथून गोवा व नागपूर विमान सेवा

नांदेड येथून गोवा व नागपूर विमान सेवा

नांदेड दि. ४ मार्च
नांदेड येथून बहुप्रतिक्षित नांदेड–गोवा विमानसेवा ३१ मार्चपासून सुरू होत असून, त्याचबरोबर नांदेड–नागपूर विमानसेवा देखील पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. असे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी ट्विट करून कळविले आहे.

एका माहितीनुसार Star Air कंपनीची गोवा (मोपा) – नांदेड – नागपूर ही विमानसेवा मार्च अखेरीस सुरू होणार आहे. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल.

गोवा (मोपा) – नांदेड
सकाळी ९:३० वा. गोवा (मोपा) वरून उड्डाण
सकाळी १०:५० वा. नांदेड येथे आगमन

नांदेड – नागपूर
सकाळी ११:२० वा. नांदेडहून उड्डाण
दुपारी १२:१० वा. नागपूर येथे आगमन

नागपूर – नांदेड
दुपारी १२:४० वा. नागपूरहून उड्डाण
दुपारी १:३० वा. नांदेड येथे आगमन

नांदेड – गोवा (मोपा)
दुपारी २:०० वा. नांदेडहून उड्डाण
दुपारी ३:२० वा. गोवा (मोपा) येथे आगमन

याशिवाय Fly91 ही विमान कंपनी २९ मार्चपासून नांदेड–बंगळुरू विमानसेवा सुरू करणार आहे. त्यानंतर नांदेडहून बंगळुरूसाठी दोन विमानसेवा उपलब्ध होतील.

या तीनही सेवा सुरू झाल्यानंतर नांदेडच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावरून मुंबई, पुणे, नागपूर, गाझियाबाद (हिंडन), अहमदाबाद, गोवा, बंगळुरू आणि हैद्राबाद या आठ शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होईल:
नांदेडच्या विकासाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल असून, उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्राला निश्चितच याचा मोठा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल