Home / सामाजिक / सांगवी येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याची मागणी

सांगवी येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याची मागणी

सांगवी येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याची मागणी

नगरसेवक दयानंद वाघमारे यांचे आयुक्तांना पत्र, आयुक्तांनी दिले शहर अभियंत्यांना स्थळ पाहणी करण्याचे निर्देश

नांदेड दि .- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील सांगवी येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीत कोणत्याही सुविधा नाहीत त्यामुळे या स्मशानभूमीचे सुशोभीकरण करून संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी नगरसेवक दयानंद नामदेवराव वाघमारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे केली आहे.

सांगवी येथे बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे. सध्या या स्मशानभूमीत कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरोना काळात गोवर्धन घाट येथील जागा अपुरी पडली तेव्हा आणि अलीकडच्या काळात गोदावरी नदीला महापूर आल्यानंतर याच ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले होते. भविष्यात देखील आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास बौद्ध समाजासाठी सांगवी येथील बौद्धांची स्मशानभूमी उपयोगात येणार आहे.

प्रशासकीय काळातही सांगवी स्मशानभूमी परिसराचा विकास झाला नाही. त्यामुळे आता सांगवी येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमी विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी, उद्यान तयार करावे, बसण्याची व्यवस्था करावी, पाणी आणि दिवाबत्तीची सोय करावी अशा विविध मागण्या नगरसेवक दयानंद वाघमारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेऊन एका पत्राद्वारे केली आहे. या पत्रानंतर महापालिका आयुक्तांनी शहर अभियंत्यांना सूचना देत स्थळ पाहणी करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल