Home / राजकारण / ही कसली घाई

ही कसली घाई

ही कसली घाई

नांदेड दि .
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 45 जागावर विजय मिळवून एक हत्ती सत्ता मिळवली हे सर्वांना ज्ञातच आहे परंतु जे काही घटनाक्रम घडत आहे यामध्ये निवडणुका हा सर्वात महत्त्वाच्या आहेत ज्याप्रमाणे नगरसेवक निवडून आला त्याचप्रमाणे महापौरही निवडून येत असतो यासाठी निवडणूक आयोगाने महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून दहा तारखेला त्याची निवड होणार आहे आणि या प्रक्रियेमध्ये संविधानात्मक ज्या काही घटना आहे त्या घडत आहेत महापौर हा बिनविरोध निवडून येऊ नये किंवा लोकशाही जिवंत आहे याचे उदाहरण देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार दिलेले आहेत तसेच एआयएमआय जे आहे त्यांनीही आपली उमेदवारी दिलेली आहेत यामुळे निवडणूक आढळ आहे परंतु भारतीय जनता पक्षाला अशी काय घाई पडली की त्यांनी आजच म्हणजेच दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सर्व शहरभर बॅनर लावून पदग्रहण सोहळा 10 तारखेला अकरा वाजता असल्याची जाहीर केले आहे

महापालिकेवर झेंडा भाजपचा फडकणार आहे हे निश्चितच आणि संख्याबळ असल्यामुळे ती निवडून येतील हे ही निश्चित आहे परंतु दोन दिवस अगोदर किंवा निवडणूक होण्याच्या अगोदर निवड झाल्याचे घोषित करणे म्हणजे लोकशाही मान्य करणे की अमान्य करणे आहे हा विषय मात्र आता नांदेडकर चवीने चर्चिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल