Home / साहित्यिक / विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन बार्टीचा भव्य पुस्तक स्टॉल उभारण्याची जनता पॅंथर ची मागणी

विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन बार्टीचा भव्य पुस्तक स्टॉल उभारण्याची जनता पॅंथर ची मागणी

विद्रोही विचारांचा महाकुंभ नांदेडमध्ये : विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन बार्टीचा भव्य पुस्तक स्टॉल उभारण्याची जनता पॅंथर प्रमुख आकाश चव्हाण यांची मागणी

नांदेड | दि.
दि. २७ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ या कालावधीत नांदेड येथे होणाऱ्या विसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यातर्फे भव्य व अधिकृत पुस्तक स्टॉल उभारण्यात यावा, अशी ठोस व जनहिताची मागणी जनता पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात मा. महासंचालक, बार्टी पुणे यांना मा. जिल्हाधिकारी नांदेड व मा. समाज कल्याण अधिकारी नांदेड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

विद्रोही साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक कार्यक्रम नसून संविधान, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे वैचारिक आंदोलन आहे. या संमेलनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ, त्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके, भारतीय संविधानाची अधिकृत आवृत्ती तसेच देशातील महापुरुषांच्या विचारांवरील दर्जेदार साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बार्टीचा पुस्तक स्टॉल अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बार्टी पुस्तक स्टॉलमुळे होणारे लाभ :
▪️ विद्यार्थी, संशोधक व वाचकांना अधिकृत व दर्जेदार साहित्य उपलब्ध होईल
▪️ संविधानिक मूल्यांचा प्रभावी प्रचार-प्रसार होईल
▪️ शासनाच्या अधिकृत पुस्तकांच्या विक्रीमधून आर्थिक उत्पन्न मिळेल
▪️ सामाजिक प्रबोधनाच्या शासकीय उद्दिष्टांना बळकटी मिळेल

ही मागणी पूर्णतः सार्वजनिक हिताची असून शासनाने यास सकारात्मक प्रतिसाद द्यावा व आवश्यक त्या प्रशासकीय परवानग्या व सहकार्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

हे निवेदन देताना आकाश चव्हाण, शिवाजी गोडबोले, अशोकराज कांबळे, प्रवीण पाटील, एजाज शेख, शंकर उबाळे पाटील, सुमनबाई रगडे, रेखाबाई खिराडे, सुशीलाबाई रगडे, जिजाबाई पाटील वाघमारे, मिराबाई चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल