Home / राजकारण / उमेदवारापुढे नवीन आव्हान

उमेदवारापुढे नवीन आव्हान

उमेदवारापुढे नवीन आव्हान

नांदेड दि.-
नांदेड शहर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया जशी जशी जवळ येत आहेत तसे तसे उमेदवारांचे अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.

यापूर्वी पक्ष कोणता या विचारात भावी उमेदवार चिंतेत होते आपला पक्ष आपल्याला तिकीट देतो की नाही याचा विचारामधे दिवस रात्र एक झाले आणि तिकीट वाटपात जे व्हायचे ते झाले आणि 90 टक्के उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला एवढेच नव्हे तर पक्षप्रमुख आ. प्रताप पाटील चिखलीकर, खासदार अशोकराव चव्हाण,आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, खासदार रवींद्र चव्हाण, अविनाश भोसीकर, प्रकाश मारावार यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला बंडखोरीच्या पुढे लोटांगण घालण्यापर्यंत वेळ आली होती हे सर्व होत असताना आता नवीन समस्या उमेदवारांपुढे उद्भवल्याचे दिसून येत आहे मतदार यादी मध्ये प्रचंड घोळ असल्याचे आता निदर्शनात येत आहे.

उमेदवारांनी आपली उमेदवारी मिळवण्यासाठी केव्हढी मेहनत घेतली त्यांनाच माहिती आणि आता मतदार राजा पर्यंत जाण्याची तयारी सुरू करत असताना मतदार यादी पाहिली तर उमेदवारांचे डोके चक्रावल्याचे दिसून येत आहे त्याचे कारणही तसेच आहे आपल्या प्रभागातील अनेक मतदारांची नावे इतर प्रभागात गेल्याची दिसून येत आहे एकाच कुटुंबातील चार व्यक्ती परंतु प्रभाग मात्र तीन दिसून येत आहेत यामुळे उमेदवारांना आपली मतदार इतरत्र गेल्याने वेगळाच ताप होऊन बसला आहे एका प्रभावत असे मतदार जवळजवळ 500 ते 1000 असून यामुळे मतदारांना सुद्धा निवडणुकीच्या मतदानादिवशी मनस्ताप होतो की काय असे दिसून येत आहे यासाठी प्रत्येक मतदारांना जागृत राहून आपले मतदान कुठे आहे याकडे लक्ष द्यावे लागेल यापेक्षाही उमेदवारांनाच डोकेदुखी झाली असून आपले मतदार कुठे कुठे आहेत याचा शोध घेऊन त्या मतदारांना सुद्धा जागृत करण्याची वेळ आता उमेदवारावर आली आहे.

– निलंगेकर विजय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल